मुंबई@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
अनेक कार्यक्रमात आम्ही छायाचित्रकार म्हणून उपस्थित असतो. काढलेले फोटो पाहून समाधान व्यक्त केले जाते. आमचा सत्कार मात्र कुठेही होत नाही. परंतु, माणदेशी महोत्सव मध्ये चेतना सिन्हा (भाभी) यांनी आमचा सत्कार केला याचा व याचा सार्थ अभिमान असून आम्हाला बळ दिले आहे, अशी प्रतिक्रिया धनंजय पानसांडे यांनी व्यक्त केली आहे.
माणदेशी महोत्सवाचे मुंबई येथेे छायाचित्रीकरण करण्यासाठी म्हसवड येथील छायाचित्रकार व दैनिक सत्य सह्याद्री चे प्रतिनिधी धनंजय पानसांडे, राजू केवटे यांची पूर्णवेळ उपस्थिती होती. माणदेशी फौंडेशन च्या सर्व चांगल्या कामाचे फोटो माध्यमापर्यत पोहोचवण्याचे उत्कृष्ट काम या दोन फोटो ग्राफर नी प्रामाणिकपणे केले असल्याचे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले.
त्यामुळे मुंबई येथील माणदेशी महोत्सव मध्ये त्यांचा माणदेशी फौंडेशन च्या वतीने सत्कार करण्यात आला त्याबद्दल त्यांनी माणदेशी फौंडेशन च्या सर्वेसर्वा चेतना सिन्हा(भाभी) यांना धन्यवाद दिले.
No comments:
Post a Comment