चौकीचा आंबा येथे मटका अडडयावर कारवाई मालकासह सहा जणांवर गुन्हा दाखल; २५ हजारांचा मुद्देमाल जप्त - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, March 27, 2019

चौकीचा आंबा येथे मटका अडडयावर कारवाई मालकासह सहा जणांवर गुन्हा दाखल; २५ हजारांचा मुद्देमाल जप्त

 

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 

औंध:-खटाव तालुक्यातील चौकीचा आंबा येथे मटका घेत असणाऱ्यासह खेळणाऱ्या व त्यांच्या मालकांवर कारवाई केल्याची माहिती औंध पोलिसांनी दिली  या कारवाईत सहा जणांवर कारवाई करून २५३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


याबाबत औंध पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की चौकीचा आंबा या ठिकाणी एका झाडाखाली मुबई नावाचा मटका कोणीतरी घेत असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयास त्यांच्या खबऱ्यामार्फत मिळाली.त्यानुसार तिथे  छापा टाकल्यानंतर प्रताप महादेव कनवाळू रा.भोसरे यांची झडती घेतली असता ८६४० रु.रोख व एक १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल त्याच्याकडे सापडला त्यावेळेस तिथे असणारे संतोष शिवाजी भोसले,हणमंत विठ्ठल मदने दोघेही रा.भोसरे,जाकीर हुसेन मुल्ला रा.कोकराळे, काशिनाथ तुकाराम मोरे रा.जायगाव या सर्वांची झडती घेतली असता त्यांच्याकडे काही रोख रक्कम,व मटक्याचे चार्ट सापडले असे एकूण मिळून १०३७० रुपये रोख व मोबाईल असे मिळून २५३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.प्रताप कनवाळू यांना कोणाच्या सांगण्यावरून हा मटका घेत असल्याचे पोलिसांनी विचारताच त्यांनी वडूज येथील दशरथ गोडसे यांच्या सांगण्यावरून घेत असल्याचे सांगितल्यानंतर वरील संशयितांंसह गोडसे यांच्यावरही महाराष्ट्र जुगार कलम कायदा १२ अ प्रमाणे फिर्याद देण्यात आली आहे, वरील पाच आरोपीना औंध  मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे तर मालकाचा शोध औंध पोलीस घेत आहेत.सदरचा खबरी जबाब पोलीस नाईक अमोल माने यांनी दिली आहे, सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल वडनेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुनील जाधव करीत आहेत.

No comments:

Post a Comment