सातारा मध्ये परीवर्तन घडविल्या शिवाय राहणार नाही:प्रा नितीन बानुगडे पाटील - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, March 27, 2019

सातारा मध्ये परीवर्तन घडविल्या शिवाय राहणार नाही:प्रा नितीन बानुगडे पाटील


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 

महाबळेश्‍वर: शिवसेना भाजपा यांची युती होवु नये या साठी आघाडीने देव पाण्यात बुडविले होते युती होणार नाही असे वातावरण होते तेव्हा अनेक धुरंधर नेते मी लोकसभा लढणार असे म्हणत होते परंतु जेव्हा युती जाहीर झाली तेव्हा लढणार म्हणणारे अनेक रथी महारथी यांनी शेपुट घातले व मी नाही लढणार असे जाहीर करू लागले जर युती झाली नसती तर आघाडी पुन्हा देश लुटायला सज्ज झाली असती ही संधी त्यांना पुन्हा मिळु नये म्हणुनच युती करण्याचा निर्णय आम्ही घेतला असुन सातारा मध्ये परीवर्तन घडविल्या शिवाय राहणार नाही शब्दात शिवसेनेचे उपनेते प्रा नितीन बानुगडे पाटील यांनी विश्‍वास येथे बोलताना व्यक्त केला.



शिवसेना भाजपा यांच्या सह घटकपक्षांच्या महायुतीचे सातारा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी वाई महाबळेश्‍वर खंडाळा विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या पदाधिकारी यांचा संयुक्त मेळावा येथील हॉटेल ड्मिलॅण्ड च्या सभागृहात आयोजित केला होता त्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना सातारा सांगली जिल्हा संपर्क प्रमुख प्रा नितिन बानुगडे पाटील हे बोलत होते त्यांनी आपल्या भाषणात खा शरद पवार यांच्या निवडणुक लढविणार असल्याच्या घोषणा करून पुन्हा माघार घेतली या कृतीची खिल्ली त्यांनी उडविली पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्ाईकचा निर्णय घेतला आपल्या शुर जवानांनी प्राणाची बाजी लावुन पाक मध्ये घुसून दहशवादयांचे अड्ड्े उध्वस्त केले या अतुलनिय शौर्याचे पुरावे काहीजण मागत आहेत ही लाजीवाणी बाब आहे आता भारत बदललाय याची प्रचिती सर्वांना आली आहे परंतु या पुर्वी असे घडले नाही पन्नास वर्षात अनेक वेळा दहशतवादी हल्ले आपल्यावर झाले परंतु कॉग्रेस सरकारने काय केले तर काही नाही फक्त दम दिला परंतु आता नरेंद्र मोदी यांनी उरी पाठोपाठ पुलवामा हल्ल्यांचा बदला घेतला आणि तुमच्या घरात घुसून प्रतिहल्ला करण्याची ताकत भारता मध्ये आहे हे सिध्द करून दाखविले असा आत्मविश्‍वासने निर्णय घेणारे सरकारचे हात बळकट केले पाहीजेत देश घडविण्याची ही निवडणुक आहे देशाचे पुढील पाच वर्षांचे भवितव्य ठरविणारी ही निवडणुक आहे गल्लीतील ऑर्केस्ट्ा नाही कि तेथे कॉलर उडवायची आणि सिनेमातील डायलॉग मारायची ़ इंदिरा गांधी यांनी पुर्वी गरीबी हटाव ही घोषणा दिली होती आता पुन्हा तीच घोषणा त्यांचे नातु राहुल गांधी देत आहेत मग 50 वर्षे तुम्ही काय करत होता असा सवाल करून आज आपल्या देशाने मिशन शक्ती यशस्वी करून अंतराळातील 300 कि मी अंतरावरील सॅटेलाईट मिसाईलने पाडुन जगात चौथा देश होण्याचा मान मिळविला अमेरीका रशिया व चीन या देशा नंतर असे तंत्रज्ञात आत्मसात करणारा भारत हा चौथा देश ठरला आहे सर्व भारतीयांची मान गर्वाने उंचविणारी ही घटना आहे याही पेक्षा भारताला अधिक पुढे घेवुन जाण्यासाठी आपला हक्काचा खासदार लोकसभेत पाठवा असे आवाहन प्रा नितीन बानुगडे पाटील यांनी आपल्या भाषणात केले.



आपल्या जिल्हयातील प्रश्‍न लोकसभेत मांडुन ते सोडविण्याचे काम विदयमान खासदार करतात का असा प्रश्‍न शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी आपल्या भाषणात उपस्थित केला युवकांना रोजगार मिळावा या साठी काही प्रयत्न झाले का पदवी पर्यंत शिक्षण घेवुन आज आपल्या जिल्हयातील अनेक युवक मुंबईत माथाडी कामगार म्हणुन जीवन जगत आहे जिल्हयात सर्व थरात खुप रोष आहे हा सर्व मतपेटीतुन बाहेर पडुन जिल्हयात परीवर्तन घडल्या शिवाय राहणार नाही जिल्हयात हिंदुराव निंबाळकर यांच्या रूपाने शिवसेनेचे खासदार निवडुन आले होते तसेच सदाशिव सपकाळ हे आमदार झाले होते या विजयात माथाडी कामगारांची भुमिका महत्वाची होती सर्व माथाडी कामगार एकवटला होता आता पुन्हा त्याची पुर्नरावृत्ती घडुन पुन्हा सातारा जिल्हयात महायुतीचा उमेदवार विजयाी झाल्या शिवाय राहणार नाही असा विश्‍वास नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला ते पुढे म्हणाले की पर्यटन स्थळाच्या विकासात खासदार यांचे काहीच योगदान नाही आजही अनेक गावांना गावठान नाही त्या मुळे अनेक समस्या स्थानिक लोकांना सहन कराव्या लागत आहेत विविध झोन आघाडी शासनाने या तालुक्यावर लादले व येथील ग्रामिण भागातील लोकांचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे तालुक्याला झोन मुक्त करण्या साठी प्रयत्न करणे आवश्यक आहे ते काम मी पुर्ण ताकतीने करीन असे आश्‍वासन नरेंद्र पाटील यांनी आपल्या भाषणात देवुन महायुतीच्या सर्व पदाधिकारी यांनी आपल्या मधील मतभेद बाजुला सारून एकदिलाने काम करून मताधिक्याने तुमचा प्रतिनिधी म्हणुन मला लोकसभेत पाठवा असे आवाहनही नरेंद्र पाटील यांनी केले या वेळी प्रास्ताविक शिवसेनेचे प्रभारी जिल्हा प्रमुख्य यशवंत घाडगे यांनी तर आभार भाजपाचे अनुप सुर्यवंशी यांनी मानले.



या वेळी माजी जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम जाधव माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर राजेश कुंभारदरे भाजपाचे माजी जिल्हा प्रमुख अविनाश फरांदे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख रणजितसिह भोसले उपजिल्हा प्रमुख सचिन वागदरे शिवसेना महीला आघाडी संघटक शारदा जाधव नगरसेवक रविंद्र कुंभारदरे संजय पिसाळ माजी जिल्हा प्रमुख गोपाळ वागदरे तालुका प्रमुख संजय शेलार लिलाताई शिंदे महेश शिंदे विजय नायडु गोपाळ वागदरे आदी मान्यवरांसह शिवसेना भाजपा आरपीआय रासप आदी पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment