पळशीजवळ चुलत भावाचा केला धारदार शस्त्राने खून - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, March 29, 2019

पळशीजवळ चुलत भावाचा केला धारदार शस्त्राने खून

 
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
पिंपोडे बुद्रुक 
     बिचुकले ता.कोरेगाव येथील राजेंद्र प्रकाश गायकवाड याने आपला चुलतभाऊ किरण संजय गायकवाड रा.बिचुकले वय अंदाजे २६ याचा पळशी गावचे हद्दीत पीरटेकडी शिवारात सायंकाळी ५ वाजण्याचे सुमारास कोयत्यासारखे धारदार शस्त्राने मानेवर सपासप वार करून खून केल्याची घटना घडली आहे.
      आरोपी व मयत इसम हे दोघेही बिचुकले येथे राहणारे असून आज ते पळशी गावचे हद्दीत पीरटेकडी शिवारात एकत्र आले असता कोणत्यातरी कारणावरून त्यांच्यात जोरदार भांडण होऊन मारामारी झाली. त्यातच किरण गायकवाड याचे मानेवर कोयत्यासारखे वार होऊन तो जागेवर कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.याची खबर फोनवरून पळशी ता.कोरेगाव येथील शिवाजी शंकर सपकाळ यांना कोणीतरी दिल्याने त्यांनी तत्काळ सातारारोड पोलीस दूरक्षेत्रात याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा सुरु केला.त्यानंतर चौकशी सुरु केली असता नाट्यमय घडामोडी होऊन आरोपी राजेंद्र गायकवाड रा.बिचुकले हा स्वतः हून नजीकच्या वाठार पोलीस ठाण्यात हजर झाल्याचे सातारारोड पोलिसांना कळाले.रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याचे काम सातारारोड पोलीस दूरक्षेत्रात सुरु होते त्यामुळे आरोपीने नक्की कोणत्या कारणासाठी चुलतभावाचा खून केला हे समजू शकले नाही. पुढील तपास सपोनि साळुंखे करीत आहेत.
--------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment