देवापुरच्या युवकांचा समाजाभिमुख उपक्रम - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, March 27, 2019

देवापुरच्या युवकांचा समाजाभिमुख उपक्रम


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क


म्हसवड: प्राचीन मंदिरे हि पराक्रमाची साक्षीदार असून त्यांचा इतिहास जपणे .व पूर्वजांच्या पराक्रमाची गाथा आताच्या पिढीला समजावी .या उदात्त हेतूने देवापुर .ता  माण मधील युवकांनी  अनेक वर्ष प्रलंबित असणारे व म्हसवड परिसरासह अखंड मान्देशचे श्रद्धा स्थान असणारे देवापुरमधील शंभू महादेवाच्या परिसरातील डागडुजीचे काम हाती घेतले आहे.  मंदिराचे कठडे दुरुस्ती , बारवातील गाळ काढणे व वीजव्यवस्था, पाणी व्यवस्थापन ,वृक्ष लागवड यासारखे अनेक मुद्दे घेऊन प्रत्यक्षात युवाटीम या कामी श्रमदान करत आहे  देवापुरच्या सर्व समाजातील युवकांचा या विधायक कामाला हातभार असून त्यांचे इतिहास प्रेमी व परिसरातून कौतुक होत आहे .



दक्षिण हिंदुस्तानात प्राचीन  काळी राष्ट्रकुटांची घराणी अनेक वर्ष राज्य करीत होती  त्यापैकी मानाड्क राजा याठिकाणी राज्य करत होता  त्यानंतर मानाड्क पुत्र देवराज राजा या ठिकाणी राज्य करू लागला  म्हणून इथल्या पवित्र नगरीला देवापुर म्हणून संबोधले जाते  सातारा -सांगली -सोल्हापूर जिल्याच्या सीमेवर असणारे हे गाव असून या गावावर इसवी ३७५ च्या सुमारास मानाड्क राजाने राज्य केले होते .शासकीय निधीवर अवलंबून न राहता गावचे किम्बुवंना परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या या प्राचीन मंदिराची डागडुजी करण्याचा युवापिढीने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे . अशा हा  ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी युवक सरसावले आहेत .


देवापुर हे गाव संवेदनशील गाव असून राजकारणाच्या बाबतीत संपूर्ण जिल्ह्याला परिचित असणारे गाव म्हणून देवापुरची ओळख. राजकारणामुळे   गटातटात विभागलेला तरुण कित्येक काळानंतर एकत्र येऊन समाजाभिमुख काम करतोय  जातीपातीची बंधने झुगारून एकत्र युवा पिढी आल्याचे समाधान होत  आहे.- एक शिवभक्त

No comments:

Post a Comment