शिवसेना व शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांचे विचारांनी प्रेरित होऊन बाल वयामध्येच भगवा हाती घेत मतदानाचा हक्क नव्हता अशात उपशाखाप्रमुख,शाखाप्रमुख,उप-विभागप्रमुख,वि.प्रमुख,उप-ता.प्रमुख ते दहा वर्षे तालुकाप्रमुख आणी गेली सहा वर्षे आजमितीस उपजिल्हाप्रमुख पदावरती पक्षामध्ये गेली 28 वर्षे अव्याहत कार्य करताना शिवसेना ,मातोश्री आणी ठाकरे कुटुंबावरील निष्ठा व समाजकार्याचे जोरावरती आज आयुष्याचे 46 वे वर्षामध्ये देखील त्याच जोमाने कार्यरत आहे. सन 2017 साली मी स्वत:चे संकल्पनेतून महाराष्ट्रभर वैयक्तिक शिवसैनिक निर्धार व संपर्क भेट काढून " मला सांभाळलत, उध्दव -आदित्यला सांभाळा" या मा.बाळासाहेबांचे अंतिम आवाहनाची आठवण करुन देत खेड्या- वाड्या पर्यंत पोहचलो हे सर्व ठाकरे कुटुंबाप्रति प्रेम व निष्ठेमुळेच शक्य झाले. गुवाहाटी (आसाम) मधील प्रसंगदेखील माझे जीवावरती बेतणारा तितकाच माझे जीवन उद्ध्वस्त करणारा ठरला असता. मोदी-शहांच्या सत्तापिपासू वृत्तीमुळे सर्व फौजफाटा लावलेला असताना त्यात घुसून बंडखोरांना आवाहन दिलं, जर का आसामचे सगळेच पोलिस अधिकारी माणुसघाणे व सत्ताकेंद्रीत असते तर मला गुवाहाटीमधील गजाआड आजही राहावे लागले असतं. माझ्या कळत्या आयुष्यातील सगळी वर्षे व प्रत्येक क्षण मी मा.बाळासाहेब ठाकरे व मातोश्रीच्या निष्ठेवरती अर्पण केला आहे हे माझे संचित आणी मी माझे भाग्य समजतो. वंदनीय मा.बाळासाहेब ठाकरे या उत्तुंग अशा व्यक्तीमत्वांचे नेतृत्व मला लाभायला माझ्या पूर्व जन्माची पुण्याई कामाला आली असावी. प्रत्यक्ष साहेब असताना अनेक पदावरती काम करायला मिळाले परंतु माझेकडे साधी सायकल नसताना संपूर्ण माण तालुक्याचा तालुकाप्रमुख पदाची संधी देणारा मोठ्या मनाचा देव फक्त मा.बाळासाहेबचं. आज साहेब शरिराने आमच्यात नाहीत परंतु त्यांचे विचार आमचे रक्तात मिसळलेत ही श्रीमंती आम्हा कडवड व निष्ठावंत शिवसैनिकांकडे कायम राहील. साहेबांमुळे आज स्वर्गाचे सुख भोगणारे काही कायम दरिद्री व दळभद्री विचारांची पिलावळ आज साहेबांचे मुळावर बाहेरुन घाव घालत आहेत हे सबंध हिंदूस्थान पाहतो आहे. अशातच ठाकरे व मातोश्रीच्या जवळ राहून आजदेखील काही ईप्सिते साध्य करणारे काही जबाबदार पदाधिकारी व त्यांची पिळावळ देखील तितकीच घातकी आहे. या अशा आयाराम -गयारामांचा वावर कायम वरिष्ठ नेते, शिवसेना भवन,मातोश्रिमध्ये असल्यामुळेच निष्ठावंत शिवसैनिकांना तिथपर्यंत पोहचण्यात मोठी अडसर होते आहे.ही खरी शोकांतिका आहे. सत्तापिपासू व आपमतलबी नुकतेच पक्षात आलेल्या काही कार्यकर्त्यामुळे निष्ठावंत व कडवट शिवसैनिकांची वरिष्ठ नेतेमंडळींकडे जाणूबूजून बदनामी केल्याने पुन्हा निष्ठावंतांना बेदखल करण्यात अशी मंडळी माहीर असतात व त्यांना त्यात यश येते. याचाच परिपाक म्हणजे नुकत्याच जिल्हाप्रमुख पदांच्या जाहीर झालेल्या निवडी होय. शिवसेना व ठाकरे कुटुंबीयांवरील संकटाचा काळ पाहता आता अशा विषयांना महत्व देऊ ईच्छित नाही परतु चुकीच्या गोष्टींना थारा नाही अशात मन शांतही बसू देत नाही. या सर्व घडामोडींचा नक्कीच वेळप्रसंगी पर्दाफाश करत अस्तानीचे साफ ठेचायला बाळासाहेबांच्या कडवट व कट्टर माझ्यासारख्या अनेक शिवसैनिकाला वेळ लागणार नाही असे आवाहनच शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यानी करतानाच या अशा स्वयंभू चमचेगिरी करणार्या नेत्यांच्या सोबत जे की माझे कायम अवमूल्य करतात यातील एक स्वयंभू भावी आमदार व दुसरा जिल्हा व वरिष्ठ असलेल्या पदाधिकार्याचे संगनमताने सुरु असलेल्या कुटील कारस्थानी डावपेची आयारामांचे हाताखाली मी पदावरती काम करणे आता योग्य समजत नसलेनेच मी शिवसैनिक म्हणून तो देखील ठाकरे कुटुंबाचा पूर्वी आणी आजदेखील कार्यरत असणार असल्याचे भोसले यांनी सांगतानाच ठाकरे कुटुंबाचे बिकट प्रसंगी पाठ दाखवून पळून जाणारा नव्हे तर शत्रुवर चाल करुन जीव गेला तरी बेहत्तर पण शत्रूला फाडण्याची मनसा आजही राखणारा मी सच्चा शिवसैनिक आहे असे भोसले यांनी सरतेशेवटी ठासून सांगितले आहे.
Wednesday, September 7, 2022
Home
Unlabelled
मी निष्ठावंत, माझ्याविरोधात कुटील कारस्थान: संजय भोसले
मी निष्ठावंत, माझ्याविरोधात कुटील कारस्थान: संजय भोसले

About सत्य सह्याद्री
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment