Hot Posts

6/recent/ticker-posts

सिने अभिनेता अक्षयकुमार कडून कुकुडवाड येथील शहीद कुटुंबियांना मदत



म्हसवड धनंजय पानसांडे 
म्हसकरवाडी ता.माण येथील जवान सुनिल सुर्यवंशी हे एकवर्षापुर्वी सियाचिन मध्ये देशसेवा बजावत असताना  हिमसख्खखलन होऊन  त्यामध्ये शहीद झाले होते.त्यांच्या शहीद कुटुंबियास सिनेअभिनेता अक्षयकुमार याने 25हजार रूपयांचा धनादेश देऊन शहीद जवान यांना श्रध्दांजली वाहिली असून म्हसवड पोलिस ठाण्याचे सपोनि मालोजीराव देशमुख यांनी शहीद जवान यांचे वडील विठ्ठठल सुर्यवंशी याच्याकडे धनादेश सुपुर्द केला आहे.
     3फेब्रुवारी 2016मध्ये म्हसकरवाडी ता.माण येथील जवान सुनिल सुर्यवंशी हे लष्करामध्ये देशसेवा बजावत असताना सियाचीन मध्ये हिमसख्खखलन झाल्याने त्यामध्ये9जवान  गाडले गेल्याचे वृत्त आले असता देश शोकसागरात बुडाला होता.सतत 9दिवस त्या भागात पाऊस सुरू असल्याने लष्कराला मृतदेह शोधकार्य करण्यात अडचणी येत होत्या.8दिवसाच्या अथक प्रयत्न केल्यानंतर मृत शोधण्यात यश आले होते.या कर्नाटकचे जवान हणमंतथप्पा हे जिवंत होते.हा ऐक चमत्कार घडला होता.त्यांना उपचारासाठी दिल्ली येथे आणण्यात आले होते.संपुर्ण देश त्यांच्या साठी दुवा करत होता.मात्र त्यांना वाचवण्यात अपयश आले होते.यामुळे देश शोकसागरात बुडाला होता.
       या शहिदा मध्ये माण तालुक्यातील म्हसकरवाडी येथील जवान सुनिल सुर्यवंशी हे शहीद झाले होते.त्यांच्या पश्चात आई-वडिल पत्नी एक वर्षाची मुलगी भाऊ असा परिवार होता.अत्यंत सर्वसामान्य शेतकरी कुटुबातून लष्करात भर्ती होऊन देशाची सेवा करत असताना वीर मरण आलेल्या या वीर जवाना बद्दल संपूर्ण जिल्यातून शोक व्यक्त करण्यात येत होता.अनेक संस्थांनी या कुटूबाला आर्थिक मदत केली होती.
        आता सिनेअभिनेता अक्षयकुमार यांनी देशसेवा बजावताना शहिद झालेल्या जवानाच्या कुटूबांना आर्थिक मदत देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. काल म्हहसवड पोलिस ठाण्यात सदर कुटुबियास 25हजार रूपयांचा धनादेश व दिवाळी निम्मित मिठाई पाठविण्यात आली होती.सपोनि मालोजीराव देशमूख यांनी शहीद जवान सुनिल यांचे वडील विठ्ठठल सुर्यवंशी व भाऊ तानाजी सुर्यवंशी यांना पोलिस ठाण्यात बोलवून त्यांच्याकडे धनादेश व मिठई सुपुर्त केली.या वेळी पोलिस व पत्रकार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments