महाबळेश्वर :- महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव-पाटील (आबा) यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्वर परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दहा पदाधिकाऱ्यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाबळेश्वर शहर व परिसरातील सामाजिक, प्रशासकीय तसेच सार्वजनिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी नवनियुक्त विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांकडून सकारात्मक योगदान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. महाबळेश्वरच्या विकासासोबतच नागरिकांच्या विविध प्रश्नांवर काम करताना नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाच्या जबाबदारीचा प्रभावीपणे उपयोग करावा, असे आवाहन महाबळेश्वर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी केले.
यावेळी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी सर्व नवनियुक्त विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
नवनियुक्त विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये अतुल अशोक सलागरे, सुरेखा बळवंत देवकर, लता अशोक आरडे, श्रद्धा उमेश रोकडे, भक्ती संतोष जाधव, लीला नंदकुमार मानकुंबरे, राजमोहम्मद अबुबकर शेख, अभिजित रामचंद्र खुरासने, प्रविण बबन रिंगे आणि अनिकेत अनंत रिंगे यांचा समावेश आहे.
शासनाकडून मिळालेल्या या जबाबदारीचा उपयोग महाबळेश्वर परिसरातील नागरिकांच्या समस्या, सामाजिक प्रश्न आणि विकासकामांसाठी प्रभावीपणे केला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून, या नियुक्त्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

0 Comments