मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्विकारताना श्री जानुबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.बी.कारंडे व सर्व स्टाफ.
म्हसवड (धनंजय पानसांडे )
महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगली संचलित माण तालुक्यातील विरळी येथील श्री जानुबाई विद्यालयाला जिल्हास्तरीय "कृतीशील शाळा " या पुरस्काराने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या उपसचिव डॉ.सुवर्णा खरात यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी पुणे विभागाचे शिक्षक आमदार मा.श्री दत्तात्रय सावंत , सातारा शिक्षणाधिकारी (माध्यमिक विभाग ) मा.श्री देविदास कुलाळ,जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष विजय येवले,सचिव सुनिल धनावडे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सचिन नलावडे,सयाजी कदम आदी मान्यवर उपस्थित होते .
सातारा येथील शाहू कला मंदिरात हा कार्यक्रम नुकताच पार पडला.श्री जानुबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कांरडे सी.बी.सर व सर्व स्टाफ यांनी हा पुरस्कार स्वीकारला.शालेय शिक्षणाबरोबरच विविध सामाजिक,सांस्कृतिक, कला,क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करत या शाळेने आपले महत्त्व कायम ठेवले आहे.शाळेच्या याच उपक्रमशीलतेचा गौरव म्हणून विरळी सारख्या ग्रामीण व डोंगराळ भागातील या शाळेची महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीने जिल्हास्तरीय कृतीशील शाळा पुरस्कारासाठी निवड केली.
अतिशय दुर्गम डोंगराळ भागात हे विद्यालय ज्ञानदानाचे प्रभावी कामकरीत आहे. खर्या अर्थाने या शाळेने समाज परिवर्तनाचे काम संस्थेचे अध्यक्ष आर.एस चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केले आहे . हा पुरस्कार त्या कामाची पोहोच पावती आसलेल्याचे स्पष्ट झाले.
या पुरस्कार निवडीबद्दल शिक्षण संस्थेचे चेअरमन मा.श्री आर.एस.चोपडे सर व सर्व संचालक,विरळी व परीसरातील ग्रामस्थ यांनी मुख्याध्यापक व सर्व स्टाफचे कौतुक केले .
तळागाळातील मागासलेल्या समाजाला शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी अहिल्या शिक्षण संस्थेची स्थापना झाली असून तो उद्देश खर्या अर्थाने आज सफल झाला आहे.
आर.एस.चोपडे ,अध्यक्ष महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था, सांगली.

0 Comments