लोणंद/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा
येथील ठोंबरेमळ्यातील एका घरात गोड बोलून शिरलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी पॉलिशच्या बहाण्याने साडेसहा तोळे दागिन्यांवर डल्ला मारला. याबाबत लोणंद पोलीस ठाण्यात चोरीची नोंद झाली आहे. सोनाली राहूल धायगुडे यांनी याबाबतची फिर्याद दिली.
लोणंद ता खंडाळा गावच्या हद्दीत ठोंबरेमळा येथे गुरुवारी सकाळी अकरा च्या सुमारास सोनाली धायगुडे हे घरी एकट्याच होत्या. त्यावेळी 25ते 30 वयोगटातील अज्ञात दोन इसमांनी पितळी धातूच्या मुर्ती चांदीचे पंचपाळ पॉलीश करून दिले. त्यानंतर दागिने पॉलिश करून देतो, असे सांगितले व दागिने घेऊन पोबारा केला. साडेतीन तोळे वजनाचे आणि दोन्ही बाजूला चेन असलेले सोन्याचे गंठण, त्यामध्ये त्यामध्ये दोन डोरली, दीड तोळा वजनाचे एक मणी गंठण आणि गणपतीचे पेन्डल असलेली दीड तोळ्याची चेन असा एकूण साडेसहा तोळे दागिने त्यांनी हातोहात लंपास केले.

0 Comments