सातारा/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा
येत्या आठवडाभरात सातार्यातील परप्रांतियांविरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांना हाकलून देणार असल्याची घोषणा ‘मनसे’ पदाधिकार्यांनी सातार्यातील पत्रकार परिषदेत केली. कोडोलीत एका परप्रांतियाने अल्पवयीन मुलीशी चाळे केल्याची घटना उघड करून ‘त्या’ नराधमाला पोलिसांच्या ताब्यात दिल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेने आपली भूमिका मांडली.
दरम्यान, घडलेल्या या घटनेतील संशयिताचे नाव राजेश नायर (वय 22), असे असून त्याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात पोक्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार, धैर्यशील पाटील, युवराज पवार यांच्यासह पदाधिकारी होते. शहराध्यक्ष राहुल पवार म्हणाले, शहरातील परप्रांतियांची माहिती पोलिसात नाही. ती असायला हवी. ज्याची नसेल त्याला त्याच्या राज्यात परत पाठवा. अन्यथा प्रसंगी कायदा हातात घेवून त्यांना आम्ही पाठवू.
गेम दाखवण्याच्या बहाण्याने गैरकृत्य
कोडोलीच्या गणेश चौक परिसरात डॉ. अरविंद गावडे यांच्या तीन मजली घरात अनेक परप्रांतिय राहतात. त्यातली राजेश नायर याने एका कुटुंबासमवेत राहणार्या अल्पवयीन मुलीसमवेत मोबाईलवर गेम दाखवण्याच्या बहाण्याने लगट करत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. हे कृत्य प्रत्यक्ष मुलीच्या वडिलांनी पाहताक्षणी त्याला बाजूला ओढले आणि त्याला समज दिली. यावेळी जमलेल्या काही शेजारील लोकांनी त्याला दम देण्याचा प्रयत्न केला असता राजेश नायर याने चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही माहिती काहिजणांनी मनसेच्या पदाधिकार्यांना ही माहिती कळवली. मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळी लगेच पोहचले. त्यांनी राजेश नायरला पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले.परप्रांतियांना घर भाड्याने देणार्या डॉ. अरविंद गावडे यालाही गुन्ह्यात सह आरोपी करण्याची मागणी मनसेने केली आहे.
या घटनेने आणि परप्रांतियांच्या विरोधात मोहिम राबवण्याची माहिती देण्याबाबत मनसेने पत्रकार परिषद आयोजित केली होती.

0 Comments