अजित जगताप
सातारा : वाळकेश्वर ते निझरे असा प्रवास करून एक महिन्यात कोरोना विषाणूने
राज्यात विखुरलेल्या जावळीकरांची व जिल्हा प्रशासनाची झोप उडविली होती.बघता
बघता सहा पर्यंत कोरोना बाधित निघाले. अनेक निर्बन्ध सहन करून सर्व
सामान्य गरीब जनतेने उपासमार सहन केली. आज सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
याचे खरे शिलेदार गोर गरीब जनता असल्याचे मत व्यक्त होत आहे.
छञपती शिवरायांच्या कालखंडात जावळीतील डोंगर दऱ्यातील मावळ्यांनी
स्वराज्याच्या साठी रक्त सांडले होते. तसेच जावळीच्याच चंद्रराव मोरे यांनी
छत्रपती शिवराय यांच्याशी गद्दारी केली होती. या कोरोना लढ्यातही गोर गरीब
रोजगार बुडवून उपाशीपोटी लढा देत होते.तर काही जण नफेखोरी करून व्यापारी
वृत्तीने वागले होते. अनेक गावात सुविधा नसतानाही ग्रामस्थांनी लॉक डाउन चे
पालन केले. आरोग्य, पोलीस, पुरवठा विभाग, सामाजिक कार्यकर्ते आणि
तालुक्यातील प्रशासनाने अपुऱ्या साधन सामुग्रीच्या साहाय्याने लढा देऊन
कोरोना विरोधात विजय संपादन केला आहे.
जावळीतील अनेक राजकीय व सामाजिक श्रीमंतांची आर्थिक स्थिती चांगली असूनही
ज्यांनी मदत केली नाही. त्यांनी गोर गरिबांना स्वबळावर लढाई करण्यास
शिकविले.तर ज्यांनी यथाशक्ती मदत केली. त्यांनी गरीबानो, तुम्ही घरात बसून
लढा, मी पाठीशी खंबीरपणे उभा आहे हा दिलासा दिला होता. विशेषतः काहीं
दुकानदारांनी गरिबांना उधारीवर जीवनावश्यक वस्तू दिल्या आहेत. काहींनी
काळाबाजार केल्याचे दिसून आले आहे. काहींनी त्याचेही भांडवल करून आपल्या
कुवेती इतक्याच तुंबड्या भरून घेतल्या आहेत. याचा सर्व हिशोब नक्कीच
प्राप्त होणार आहे. त्या चर्चेची सुरुवात सुध्दा झाली आहे.
आज
दुपारी क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय जिल्हा रुग्णालयात पुणे येथून
प्राप्त झालेल्या अहवाला मध्ये तीन रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले.
सर्वांनी निःश्वास सोडला आहे.
लहान
बाळासह सहा जावळीकरांनी ''कोरोना ला,, गो कोरोना'' केले. तशा पद्धतीने
काहींनी भितीपोटी मुबंईतुन संकट समयी आलेल्या आपल्याच बांधवाना ''गो
बॅक''चा नारा देऊन माघारी पाठविले होते. काही चोरी छुपे राहिले. त्यांनी ही
नियम पाळले त्यामुळे धोका टळला आहे. आता जावळी करांनी भावनिक न होता. सर्व
नियमांचे पालन केले पाहिजे. कोरोना सारखा शत्रू तालुक्यातील शीव ओलांडून
गेला आहे. त्याला कोणत्याही मार्गाने प्रवेश देऊ नका. कारण, गेली दिड महिना
गावकुसाबाहेरील अनेकांनी उपासमारीची झळ सोसली आहे. त्यांना पुन्हा उभे
राहण्यासाठी तरी नियम पाळा अशी विनंती करण्यात येत आहे.

0 Comments