Hot Posts

6/recent/ticker-posts

दोन जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने कवठेकरांनी सोडला सुटकेचा श्वास


कवठे वार्ताहर: दिनांक १६
कवठे ता. वाई येथील दोन व्यक्तींचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याने कवठे गावामध्ये दोन दिवस तणावाचे वातावरण होते. या दोन व्यक्तींचा अहवाल आज प्राप्त झाला असून दोन्हीहि व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी
वेळे ता वाई येथील एक रुग्ण कोरोना पाँझीटीव्ह आढळला होता. हा रुग्ण पैसे काढण्याच्या कारणास्तव सातारा येथील एका पतसंस्थेमध्ये गेला होता. कवठे येथील दोन व्यक्ती या पतसंस्थेमध्ये कर्मचारी असल्याने पैसे काढण्याच्या वेळी या वेळे येथील कोरोना पाँझीटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्या होत्या. त्यामुळे या दोन व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सदर बाब कवठे येथील ग्रामस्थांना समजल्यानंतर ग्रामस्थांच्यात चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र सोमवार दिनांक १५ रोजी सदर दोन्ही रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे समजल्याने कवठे गावावर आलेले संकट टळले आहे .
दरम्यान दोन व्यक्तींचे स्त्रावाचे नमुने घेतल्याचे कवठे आपत्ती व्यवस्थापन समितीच्या निदर्शनास आल्यावर समितीने कवठे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर विजय ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित दोन्ही व्यक्तींचे त्यांच्या परिवारापासून तातडीने अलगीकरण केले होते. रिपोर्ट प्राप्त होईपर्यंत या दोन्ही व्यक्तींना होम कवारंटाईन करण्यात आले होते. आपत्ती व्यवस्थापन समितीने तातडीने कार्यवाही केल्यामुळे  ग्रामस्थांनी आपत्ती व्यवस्थापन समितीचे कौतुक केले आहे.

ग्रामस्थ पाळताहेत अलगीकरणाचे नियम

कवठे गावातील प्रत्येक नागरिक जागरूक असून अलगीकरणासाठी सहकार्य करीत आहेत. साधारणत: परगावाहून ८०० च्या आसपास ग्रामस्थ कवठे गावात येऊ इच्छित होते परंतु गावामध्ये पाळण्यात येत असलेल्या कडक विलगीकरणासंदर्भातील माहितींनी आजपर्यंत फक्त शंभरच्या आसपास लोक कवठे गावात येऊन विलागीकरण कक्षातून कालवधी पूर्ण करून आपल्या घरी सोडलेले आहेत, तसेच परगावाहून येणा-या व्यक्ती अगोदर समितीशी संपर्क साधत असून समितीने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करीत असल्याने कवठे गावामध्ये अजून कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नाही.

Post a Comment

0 Comments