![]() |
| तहसीलदार किरण जमदाडे साहेब यांच्याशी संवाद साधताना आंदोलन करा महिला व ग्रामस्थ (फोटो -विक्रमसिंह काळे ) |
विक्रमसिंह काळे
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
खटाव तालुक्याची राजधानी समजल्या जाणार्या व हुतात्म्यांच्या पदस्पर्शाने व क्रांतीने पावन झालेल्या वडूज नगरी मधील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आजही आंदोलने व रस्ता रोको करावा लागत आहे, ही मोठी शोकांतिका असून विद्यमान नगराध्यक्षांविरोधात जनक्षोभ वाढत असल्याचे दिसत आहे.
येथील सिद्धार्थ नगर आदिनाथ नगर व शेतकरी चौक परिसरातील पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी वन वन भटकंती करावी लागत आहे. या विषयावर वेळोवेळी लेखी नोटीस देऊन सुद्धा या समस्येकडे नगरपंचायतीच्या वतीने दुर्लक्ष केले गेल्याने नुकताच या भागातील रहिवाशांकडून व महिला वर्गाकडून हंडा मोर्चा काढून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या मोर्चाचे व आंदोलनाचे नेतृत्व सिध्दार्थ नगर व आदिनाथ नगर येथील लोकप्रतिनिधी व नगरसेविका श्रीमती शोभाताई बडेकर यांनी केले. विशेष म्हणजे या आंदोलनाला उपनगराध्यक्ष मनोज कुंभार, नगरसेवक सुनील गोडसे, कार्यकारी नगरसेवक गणेश गोडसे, श्रीकांत काळे, रंजीत गोडसे, प्रतीक बडेकर, जेष्ठ नेते अशोक बैले,तसेच सत्यवान कामाने, अॅड. राजेश चव्हाण, सागर भिलारे, धनाजी दुबळे, अजित नलवडे, भरत माळी, आनंदा दुबळे, दाऊद मुल्ला, प्रदीप खुडे, तानाजी दुबळे, सामाजिक कार्यकर्ते - धनंजय काळे, युवा नेते विकास काळे, सचिन भोंडवे, धनाजी दुबळे यांनी पाठिंबा दिला.
या मोर्चाला व रास्ता रोको आंदोलनाला रुद्र स्वरूप येऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार किरण जमदाडे साहेब यांनी पोलिस प्रशासन अधिकारी वर्गाला सोबत घेऊन घटना स्थळी भेट दिली व स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. तसेच आंदोलन करणार्या महिलांच्या संमश्या समजून घेत शांतता राखण्याचे आवाहन केले व नगरपंचायतीचे अधिक्षक अजिंक्य वनमारे , वसुली अधिकारी मकरंद जाधव , पाणी पुरवठा विभाग कर्मचारी किसन काळे , यांच्याकडून संबंधित पाणीपुरवठा यंत्रणेमध्ये झालेल्या बिघाडाची त्या ठिकाणी काम करणार्या कर्मच्यारांशी भ्रमणध्वनी वरून स्वतः तहसीलदार यांनी माहिती घेतली. घेतलेल्या माहितीच्या आधारे संबंधित पाणीपुरवठा यंत्रणा तीन ते चार तासापर्यंत पुरवत होईल व आपल्या प्रभागातील लोकांना पाणी पुरवठा सुरळीत चालू होईल असे आश्वासन दिले व जर पाणीपुरवठा पूर्ववत झाला नाही तर टँकरद्वारे नगरपंचायतीतर्फे पाणीपुरवठा करण्यात येईल असे आश्वासन तहसीलदार जमदाडे यांनी समस्त ग्रामस्थांना व महिला वर्गांना दिल्यानंतर शांततेचे वातावरण निर्माण झाले. यावेळी वारंवार विस्कळीत होणार्या पाणीपुरवठ्याबद्दल तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले
सीओ, नगराध्यक्षांना नाही गांभीर्य
यावेळी वडूज नगरपंचायतीचे सी ओ साहेब व नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अनुपस्थित राहिल्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली यावेळी प्रतीक बडेकर, आनंदा दुबळे, सत्यवान कमाने, अॅड. राजेश चव्हाण, श्रीकांत काळे , गणेश गोडसे यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.
जमत नसेल तर राजीनामा द्या
ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत शहरातील लोकांना आठ-आठ दिवस जर पाणी मिळत नसेल तर आपण शहराचा कार्यभार सांभाळण्यास असमर्थ आहात व आपण आपल्या शहराची जबाबदारी सांभाळण्यासाठी असमर्थ आहात असे समजून मनिषा काळे यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी नगरसेविका शोभाताई बडेकर यांनी केली.

0 Comments