Hot Posts

6/recent/ticker-posts

चितळी येथे रविवारी भाजप कार्यकर्ता मेळावा

सत्य सह्याद्री/चितळी
चितळी, ता. खटाव येथे रविवार दि. 14 रोजी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती युवा नेते अवि पवार यांनी दिली.
माणचे आमदार जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 9 वाजता महादेव मंदिर येथे होणार्‍या या मेळाव्यात पक्षीय ध्येयधोरणाबरोबरच चितळी परिसरातील नागरिकांच्या अडचणी तसेच अन्य विकासात्मक बाबींचा उहापोह करण्यात येणार आहे. या मेळाव्यात लाईट, रस्ते, शाळा, पाणीपुरवठा व अन्य कोणत्याही अडचणी असतील तर त्या नागरिकांनी मांडाव्यात त्याचे निवारणही तातडीने करण्यात येणार असल्याचे सांगून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन पवार यांनी केले आहे.  

Post a Comment

0 Comments