Hot Posts

6/recent/ticker-posts

मायणीत अपघात ; महिलेचा मृत्यू

मायणी : भरधाव वेगात असणाऱ्या गाडी चालकाचा ताबा सुटल्याने रसवंतीगृहाची झालेली अवस्था व गाडीचे नुकसान

मायणी : प्रतिनिधी तानाजी चव्हाण
 मायणी येथील मल्हारपेठ-पंढरपूर रस्त्यालगत असलेल्या संत सद्गुरू सुरूताई मठाजवळ कलेढोणकडून भरधाव वेगात येणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीतील चालकाचा ताबा सुटल्याने तेथे असणाऱ्या रसवंतीगृहावर व रसवंतीगृह चालविणारी निर्मला धोंडीराम लिपारे (वय ४२) या महिलेला जोरदार टक्कर दिली यात रसवंतीगृह चालवणारी महिला गंभीर जखमी झाली तिला पुढील उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटल कराड येथे पाठवले असता हॉस्पिटलला पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली.
 याबाबत घटनास्थळ व पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार कलेढोण तालुका खटाव येथील साळुंखे मळ्यातील तुषार साळुंखे (चालक),राजाराम साळुंखे, नंदाताई साळुंखे,सुप्रिया साळुंखे व दोन लहान मुली हे स्विफ्ट डिझायर एम एच १२ एस वाय ८४०४ या चारचाकी गाडीने घरात कार्यक्रम असल्याने कपडे खरेदी करण्यासाठी मायणीत येत होते गाडी मायणी अभयारण्याकडून संत सरुताई मठाकडे येताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि चालकाच्या विरुद्ध बाजूला मठाजवळ असलेल्या रसवंतीगृहाला व निर्मला धोंडीराम लिपारे यांना जोरदार धडक दिली.या धडकेत या महिलेला उडवले असता ती गंभीर जखमी झाली गाडी भरधाव वेगात असल्यामुळे ती पलटी झाली त्यावेळी मायणी व विखळे ग्रामस्थांनी तातडीची मदत करून संबंधित महिलेला पुढील उपचारासाठी कराड येथे पाठवले मात्र हॉस्पिटलला पोहोचण्यापूर्वीच या महिलेचा मृत्यू झाला तर गाडीतील सर्वांना बाहेर काढले असता सर्व सुखरूप होते.
घटनास्थळी पोलीस नाना कारंडे,पोलीस पाटील प्रशांत कोळी यांनी भेट दिली.या घटनेचा अधिक तपास बीट अंमलदार भूषण माने करीत आहेत.


Post a Comment

0 Comments