Hot Posts

6/recent/ticker-posts

वाघमोडेवाडीत भरदिवसा घरफोडी दोन लाखांचा ऐवज लंपास


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
गोंदवले: 
वाघमोडेवाडी, ता. माण येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून दोन लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सौ. उषा मोहन वाघमोडे यांनी फिर्याद दिली.
शनिवारी दि. 20 रोजी दुपारी साडेबारा ते अडीचच्या सुमारास वाघमोडे या बाहेर गेल्या होत्या.
त्ययांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटातील 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचे 30 ग्रॅम वजनाचे गळ्यातील लांब गंठण, 10 हजार रुपयांची पिळाची सोन्याची अंगठी, 7 हजार रुपयांची एक साधी अंगठी, 8 हजार रुपयांचे डोरले, 60 हजार रुपयांचे सोन्याचे मणी मंगळसूत्र व दीड हजार रुपयांचा लहान मुलांचा करदोडा असा एकूण 2 लाख 06 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
घटनास्थळी फलटणचे उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या.
अधिक तपास दहिवडीचे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे करत आहेत.    

Post a Comment

0 Comments