मेढा प्रतिनिधी :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावली तालुक्यातील मामुर्डी गावामध्ये 13 ऑगष्ट 1965 रोजी आई जनाई व वडील लक्ष्मणाच्या पोटी संपत यांचा जन्म झाला पुढे ते केंद्रप्रमुख संपतराव धनावडे म्हणून परिचयास आले घरची परिस्थीती खुप हालाखीची होती परंतु त्यांचे मोठे बंधु गणपत बुवा यांनी रामा प्रमाणे आपल्या भावांवरती प्रेम केले त्यांना शिक्षण दिले, संस्काराची शिदोरी दिली संपंत धनावडे यांना शिक्षक बनविणेत त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांचे दुसरे बंधु वसंत यांना वै ह भ प दत्तात्रय महाराज कळंबे यांचे आशीर्वादाने जावली सहकारी बँकेचा कर्मचारी बनवला . संपतराव धनावडे गुरुजी त्यांचे जन्मगाव मामुर्डी गावात सामाजीक कार्यात कायम पुढे असतात
अत्यंत शांत आणि संयमी असा स्वभाव असलेले संपतराव धनावडे 25 ऑक्टोंबर 1985 मध्ये शिक्षक झाले. शिक्षक म्हणून सुरुवात त्यांची दुर्मिळ अशा आपटी गावात झाली कि ज्याठिकाणी गाडी सोडा परंतु चालणेसाठी पुरेसा रस्ताही नव्हता. अशा ठीकाणी रोज पायपीट करून त्यांनी विद्यार्थी घडवले त्यानंतर सन 2000 साली पदवीधर शिक्षक म्हणून त्यांची पदोन्नती झाली.सन 2010 साली त्यांना तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला .सन 2013 साली त्यांची केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती झाली. त्यानंतर सन 2015 साली भणंग, हातगेघर,खर्शी बारामुरे,बेलोशी चे केंद्रप्रमुख होण्याचा सन्मान मिळाला.
केंद्रप्रमुख असलेल्या ओझरे शाळेने स्वच्छ विद्यालय पुरस्कार मिळवत देशात दुसऱ्या क्रमांकाची शाळा असलेचा मान मिळवला . त्यांचे केंद्रातील शाळेंचा वक्तृत्व स्पर्धा जिल्ह्यात प्रथम क्रमांक,बालनाट्य स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम , सुंदर परसबाग स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम , तसेच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी ,NMMS धारक विद्यार्थी , अशा विविध श्रेत्रात केंद्रातील विद्यार्थीनी सुयश मिळवले आहे त्यांनी शिक्षण क्षेत्रात 37 वर्षे 10 महिने सेवा केली आहे . अशा या अखंड ज्ञानदान सेवेतून 31 ऑगष्ट 2023 रोजी ते निवृत्त झाले आहेत. त्यांना पुढील आयुष्य सुख, समृधी, चांगल आरोग्य , भरभराटीचे लाभो हिच जागृत देवस्थान श्री केदारेश्वराचे चरणी प्रार्थना .
शब्दांकन :- सुनिल आण्णा धनावडे
-----------------------------------------------------
श्री संपतराव लक्ष्मण धनावडे गुरुजी यांचा सेवागौरव समारंभ शनिवार दि २ सप्टेबर २०२३ रोजी कलश मंगल कार्यालय मेढा एस टी डेपो समोर दुपारी १ वाजता आयोजीत केला आहे सदर कार्यक्रमास उपस्थीत राहणेचे आवाहन महेश गणपत धनावडे व अमर संपत धनावडे यांनी केले आहे
0 Comments