Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रचंड कोंडीने शहराचा श्वास गुदमरला

वाहतूक शाखेविरोधात नागरिकांचा संताप


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
सातारा ः बाप्पाच्या आगमनाच्या तोंडावर बाजारपेठेत झालेली गर्दी, त्यातच सुरु असलेले सार्वजनिक गणेश मंडळांचे आगमन सोहळे यामुळे शनिवारी व रविवारी प्रचंड कोंडीने शहराचा श्वास गुदमरला. वाहतूक शाखेच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरात नागरिकांचा संताप अनावर झाला होता

रविवारी खणआळीत अक्षरश: पाय ठेवायलाही जागा नव्हती. पोलिसांनी मोती चौक ते जुना मोटार स्टँड पर्यंतचा रस्ता वाहनांसाठी बंद ठेवल्या होता. शिवाय मोती चौकातून प्रतापगंज पेठेत जाण्यासही बंदी केल्याने वाहनांची कोंडी झाली. दुपारनंतर वाढलेली कोंडी सायंकाळनंतर जीवघेणी ठरली. 

राजवाडा बसस्थानक ते कमानी हौद दरम्यानची वाहतूक आगमन सोहळ्यामुळे शनिवारी सायंकाळी बंदच करावी लागली. रविवारीही साधारण अशीच परिस्थिती होती. त्यामुळे गल्ली बोळांमध्ये ताण वाढून झालेल्या कोंडाने वाहनधारकांची डोकेदुखी वाढली. सर्व वाहतूक पोलीस मोती चौक, जवाहर मुनोत चौक, देवी चौक, कमानी हौद येथेच असल्याने तांदूळ आळी, लंब्याचे बोळ, फुटका तलाव, न्यू इंग्लिश स्कूल चौकात वाहने अडकून पडली होती. 

आधीच मंडळांचे मंडप, त्यासाठीची रोषणाई यामुळे मुख्य आणि गल्ली बोलतील रस्ते अरुंद झाले असून चारचाकी आणि गर्दीतून दुचाकी वाहने दामटणार्‍यांमुळे कोडी फुटत नव्हती.

 क्रेनमुळे संताप अनावर

रविवारी गोलबाग ते देवी चौकापर्यंत खरेदीदारामुळे दुतर्फा पार्किंग करावे लागत होते. या काळात वाहतूक शाखेच्या क्रेनने दुपारपासून रात्री उशिरापर्यंत तब्बल 500 हून अधिक वाहने उचलून नेली. यामुळे सामान्य नागरिकांनी संताप अनावर झाला. किमान सणासुदीच्या काळात तरी वाहतूक शाखेने, केवळ नियमनावर भर द्यावा. नागरिकांना भुर्दंड देऊ नये, अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments