Hot Posts

6/recent/ticker-posts

किर्ती पवार हिची विभागीय स्पर्धेसाठी निवड

कुकुडवाड/वार्ताहर
कै आबासाहेब पोळ शिक्षण सौस्थेच्या भालवडी माध्यमिक विद्यालय भालवाडी या शाळेतील किर्ती पवार लांब उडी स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला असून तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हा क्रीडा संकुल सातारा या ठिकाणी झालेल्या जिल्हास्तरीय लांब उडी मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये भालवडी माध्यमिक विद्यालय भालवडी या विध्यालयाची विद्यार्थीनी कु.किर्ती प्रताप पवार हिची (14 वर्ष वयोगट) विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 
 त्याबद्दल संस्था मार्गदर्शक आदरणीय डॉ संदीप दादा पोळ, डॉ भारतीताई पोळ मा. जि. प. सदस्या, मुख्याध्यापक , सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी ,क्रीडा विभाग प्रमुख श्री शिवाजी साळुंखे सर,सर्व पालक ग्रामस्थ व क्रीडाप्रेमी यांनी अभिनंदन केले व विभाग स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments