मेढा येथील सभेच्या ठिकाणाची अतिरिक्त पोलीस अधिक्षक आँचल दलाल यांनी केली पाहणी - सत्य सह्याद्री

Friday, November 17, 2023

मेढा येथील सभेच्या ठिकाणाची अतिरिक्त पोलीस अधिक्षक आँचल दलाल यांनी केली पाहणी

मेढा प्रतिनिधी :- जावळीच्या राजधानीत शनीवार दि. १८ रोजी मनोज जरांगे पाटील यांची सभा छत्रपती शिवाजी महाराज चौक मेढा येथे होणार आहे. यावेळी जावळी खोर्‍यातील हजारो संख्येने मराठा बांधव या सभेला उपस्थित राहणार आहेत जावळीच्या राजधानीतील ही सभा ऐतिहासिक होणार असल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत आहे 
सदरच्या सभेच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी मेढा येथे सभेच्या
ठिकाणाची पाहणी केली तसेच स्टेज, पार्किंग व्यवस्था , येणाऱ्या लोकांच्या व्यवस्थेबाबत सकल मराठा क्रांती
मोर्चा आंदोलन समन्वयक व मेढा पोलीस स्टेशनचे ए पी आय संतोषजी तासगावकर यांच्याशी सभेच्या नियोजना बाबत चर्चा केली त्यावेळी जावळी तालुका मराठा समन्वयक उपस्थीत होते सभेस येणाऱ्या आंदोलकांची कोणतीही गैरसोय होऊ नये याच्यासाठी पोलिस प्रशासन व मराठा आंदोलन समन्वयक यांनी योग्य दक्षता घ्यावी सदरची सभा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये होणार असल्याने वाहतूकीची कोंडी होणार नाही याची सुद्दा काळजी घेणेत यावी अशा सुचना दिल्या मेढा येथे सभेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही अशी ग्वाही समन्वयकांनी दिली

No comments:

Post a Comment