दहिवडी / प्रतिनिधीअजून किमान 20 वर्ष तरीआमदार मीच आहे इतरांनी फक्त स्वप्न पहावीत त्यामुळे पिंगळीकरांनो गावच्या विकासाचा बॅकलॉग मीच भरून काढू शकतो असा विश्वास आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला ते पिंगळी बुद्रुक येथील महालक्ष्मी मंदिर समोरील पंधरा लाख रुपये खर्चाच्या सभामंडप भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन काळे सरपंच दादासाहेब काळे युवा नेते सिद्धार्थ गुंडगे मजूर फेडरेशन संचालक गणेश सत्रे पिंगळीचे सरपंच जीवन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते आमदार जयकुमार गोरे पुढे म्हणाले पिंगळी बुद्रुक गाव विकास कामाच्या बाबतीत किमान आठ वर्ष मागे गेले आहे या गावात जी काही कामे झाली ती मी केली आहेत मात्र गावाची एकी नसल्यामुळे विकास खुंटला आहे महालक्ष्मीची यात्रा दर तीन वर्षांनी भरते यावर्षी ती मे महिन्यात भरणार आहे यात्रेपर्यंत हा सभामंडप पूर्ण होऊन यात्रा याच मंडपात भरेल याचा मी शब्द तुम्हाला देतो आज पर्यंत पिंगळी बुद्रुक महिमा गड उकिरडे दिवड पांढरवाडी कोळेवाडी स्वरूप खान वाडी या गावातील ग्रामस्थ पाण्यासाठी मला कधी कोणी भेटलेच नाहीत कारण त्यांना विश्वासच नाही आपल्या गावाला ही पाणी मिळू शकते . कारण बारामतीकर फलटणकर यांनी तसे लोकांवर बिंबवलच आहे राम राजे तर म्हणायचे पृथ्वीच्या अंतपर्यंत माण तालुक्याला पाणी कधीच मिळणार नाही तेच पवार साहेब ही म्हणायचं पण मी माण तालुक्यात पाणी आणून त्यांचं म्हणणं खोटं ठरवलं पिंगळी तलावात पाणी आले आता आंधळी धरणात काही दिवसातच पाणी येणार आहे फक्त बटन दाबायचं काम शिल्लक आहे 14 किलोमीटरचा बोगदा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे मान तालुक्यातील डोंगरावरी गावे सोडली तर मान च्या प्रत्येक गावात पाणी पोहोचवणार आहे हा माझा शब्द नव्हे तर वचन आहे त्यामुळे सर्वांनी विकासाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं असं आव्हान त्यांनी यावेळी केले. या गावातील मंडळी काम सांगायला सुध्दा येत नाहीत ज्या गावाने मला घडविले राजकारणाची सुरवात या आंधळी गटात झाली पिंगळी गाव याच गटातले याच गावाने मी आमदार झाल्यावर हत्तीवरून मिरवणुक काढली होती त्या गावाला मी कधी विसरणार नाही या गावात विकासाची भूमिका घेणाऱ्या कार्यकर्त्यची वानवा कमी आहे अशा जागृत गावत विकास कामापेक्षा राजकारणच जास्त आहे या भागात एका गड्याने ऊस कारखाना व सूतगिरणी काढली आहे तो म्हणतो आमदाराने काय केले त्याच्याच गावात दीड लाख टन ऊस पिकतो जयकुमार ने पाणी आणले नसते तर कारखान्यात कुसळ घातली असती का असा सवाल त्यांनी यावेळी केला मी पाणी आणले म्हणून मान खटाव मध्ये पाच उसाचे कारखाने उभे राहिले हे ध्यानात घ्या ज्या पवारांनी पन्नास वर्षात मान साठी काही केले नाही ते मी पंधरा वर्षात करून दाखवले हेच माझे यश आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक राजेंद्र जगदाळे यांनी केल | ||||||||
Sunday, December 3, 2023
अजुन वीस वर्ष मीच आमदार इतरांनी फक्त स्वप्न पहावीत- आमदार जयकुमार गोरे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment