सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
पाटण
पाटण तालुक्यात जनतेला दळणवळणाच्या सोयी उपलब्ध झाल्या आहेत परंतु त्या दर्जेदार होण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. त्यामुळे सर्वत्र रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून शासकीय अधिकारीच दर्जेदार रस्त्यांच्या कामांसाठी अडसर ठरत असल्याची बाब समोर आली आहे.
पाटण चाळकेवाडी गजवडी या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे मात्र ज्या शाखा अभियंताकडे या रस्त्याच्या कामाची जबाबदारी आहे तो अधिकारी हे काम निकृष्ट असल्याचे मानायला तयारच होत नाही त्यामुळे सध्या दर्जेदार कामांना शासकीय अधिकारीच अडसर ठरत असल्याची बाब समोर आली आहे. पाटण चाळकेवाडी गजवडी सातारा या रस्त्याच्या कामासाठी 14.50 लाख रुपये मंजूर झाले आहेत तर गेल्या महिन्यापासून या रस्त्याचे काम मेष्टेवाडी येथून सुरू करण्यात आले आहे मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी दररोज नागरिकांमधून होत आहेत नागरिकांच्या तक्रारी संबंधित शासकीय यंत्रणेच्या निदर्शनास आणून देण्याचे काम नागरिकांकडून करण्यात येत आहे परंतु संबंधित रस्त्याची जबाबदारी असणारा शाखा अभियंता हे काम उत्कृष्ट असल्याचा निर्वाळा वारंवार देत आहे संबंधित रस्त्याचे काम सुरू असताना मेस्टेवाडी ते केर दरम्यान नागरिकांनी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे होत नाही अशा तक्रारी दिल्या होत्या त्यामध्ये रस्त्यावर 40 एम एम खडी वापरण्याऐवजी ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाची चाळीस एमएम पेक्षा कमी जाडीची खडी वापरण्यात येत आहे तर रस्त्यावर पुरेसा डांबराचा थर देण्यात येत नाही तर साईड पट्टीला मुरूम न टाकता माती टाकण्यात येत आहे त्यामुळे रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून रस्त्यावर अंतरलेली खडी वाहने येजा केल्याने उखडत आहे त्यासाठी आपण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी म्हणून संबंधित ठेकेदाराला सूचना द्याव्यात अशा तक्रारी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या होत्या मात्र संबंधित अधिकाऱ्याने ठेकेदाराची पाठराखण करत या रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे असल्याचे म्हटले आहे परंतु प्रत्यक्षात जागेवर जाऊन या रस्त्याच्या कामाची पाहणी केली असता सध्या हे काम अति जलद गतीने सुरू असून अंदाजपत्रकाप्रमाणे हे काम होत नाही घडी अंतर त्यांना डांबराचे प्रमाण अत्यल्प वापरले जात आहे तर खडीची जाडी ही अंदाजपत्रकाप्रमाणे वापरण्यात येत नाही तर लांबी रुंदी व साईड पट्ट्यांवर टाकलेली माती ही सर्व कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत त्यामुळे या कामात सुधारणा करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
सध्या पाटण तालुक्यात रस्त्यांच्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत आहे निकृष्ट कामांना अधिकारीच मूक संमती देत असल्याने दर्जेदार रस्त्यांची अपेक्षा कोणाकडून करायची असा प्रश्न नागरिकांना पडत आहे जिल्ह्याचे पालकमंत्री तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यात कोट्यावधींचा निधी रस्त्यांच्या कामासाठी आणला आहे परंतु हा निधी योग्य त्या पद्धतीने खर्च होताना दिसत नाही केवळ अधिकाऱ्यांची टक्केवारी व ठेकेदारांचा मलीदा यातच हा निधी खर्च होताना दिसत आहे जनतेच्या खिशातून खर्च होणारा पैसा साहजिकच कोणाच्या खिशात जातो हे जनतेने ओळखले आहे मात्र या सर्व बाबींचा पश्चाताप नागरिकांना करावा लागत आहे अधिकारी तीन वर्ष शासकीय कार्यालयात असतात तीन वर्षानंतर त्यांची बदली होऊन दुसरीकडे जातात मात्र नागरिकांना कायमस्वरूपी याच रस्त्यावरून ये जा करावी लागते त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांचे म्हणणे लक्षात घेऊन ठेकेदारांकडून दर्जेदार कामे करून घ्यावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे मात्र कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार सध्या पाटण तालुक्यात सुरू आहे.
पाटण चाळकेवाडी गजवडी सातारा या रस्त्याच्या कामासाठी गेल्या दहा वर्षात प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाला आहे वारंवार या रस्त्याच्या कामासाठी निधी खर्च केला जातो मात्र एका वर्षात रस्त्याची दुरावस्था होते पुन्हा खर्च केलेला निधी पाण्यात जातो या बाबीला जबाबदार कोण हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडत आहे त्यामुळे या कामाची जबाबदारी असणाऱ्या शाखा अभियान त्याने संबंधित कामाची जबाबदारी घेऊन जनतेच्या भावना लक्षात घ्याव्यात अन्यथा येथील जनतेला आंदोलन उभे करावे लागेल अशी भावना ही नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
चौकट ....
माजी मंत्र्यांकडून ही नाराजी
राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री हे या रस्त्यावरून जाता येता त्यांच्याही निकृष्ट रस्त्याची बाब निदर्शनास आले त्यांनीही रस्त्याच्या कामाबाबत ना पसंती व्यक्त केली परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाला याचे कोणतेही गांभीर्य उरले नाही उलट शाखा अभियंता यांनी हे काम उत्कृष्ट असल्याचा दावा केला आहे त्यामुळे या अधिकाऱ्यांना नेमकं कोण पाठीशी घालत आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे.
No comments:
Post a Comment