सोमवार पेठेत भरदिवसा फ्लॅट फोडला - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, December 4, 2023

सोमवार पेठेत भरदिवसा फ्लॅट फोडला

लाखाचा ऐवज लंपास, शनिवार पेठेतही घरफोडी

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

सातारा : सोमवार पेठेतील फुटका तलाव परिसरातील वरद हाईट्स या इमारतीतील सदनिका भरदिवसा फोडून फोडून अज्ञात चोरट्यांनी लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 



याप्रकरणी फिजिओथेरपिस्ट अर्चना शामसिंह राजपूत (वय 50) यांनी फिर्याद दिली. शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी 1 रोजी राजपूत या बाहेर गेल्या असताना अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कोयंडा कापून, कुलूप तोडून घरातून 40 हजार रुपयांचे मंगळसूत्र, 52 हजार रुपयांची कानातली असा 92 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी शेळके यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या. उपनिरीक्षक देवकर तपास करत आहेत. 

शनिवार पेठेतही फ्लॅट फोडला

शनिवार पेठेतील वृंदावन अपार्टमेंटमधील तिसर्‍या मजल्यावरील सदनिका फोडून अज्ञात चोरट्याने 70 हजारांचा ऐवज लंपास केला. 

याप्रकरणी मुद्रण व्यावसायिक आकाश चंद्रकांत मोहिते (वय 32, रा. 876, तिसरा मजला वृंदावन अपार्टमेंट, मूळ रा. शिवशक्ती अपार्टमेंट, केसरकर पेठ, आनंदवाडी दत्त मंदिरामागे, सातारा) यांनी फिर्याद दिली. शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दि. 27 पासून बंद असलेल्या बंद घराच्या दरवाजाचा कोयंडा उचकटून चोरट्याने 50 हजारांची रोकड, 12 हजारांचे सोन्याचे कानातले, 8 हजार रुपयांचे वेडणे असा 70 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. तपास हवालदार जंगम करत आहेत. 

No comments:

Post a Comment