फलटण प्रतिनीधी:- फलटण तालुक्यातील मौजे सरडे येथे वीज कोसळून इलेक्ट्रिक मोटर सायकलवरून जाणारे तीन युवक जखमी झाले आहेत. तिघांनाही बारामती येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ११ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास फलटण तालुक्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस सुरू झाला होता. यावेळी फलटण तालुक्यातील सरडे येथे एका इलेक्ट्रिक गाडीवर निघालेल्या ज्ञानेश्वर गहिनीनाथ ढोले (वय १७, राहणार वंजारवाडी खर्डा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर), प्रथमेश सुनील भिसे (वय १७ राहणार वायसेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर), विक्रम विजय धायगुडे (वय १६ राहणार सरडे) यांच्यावर वीज कोसळून मोटर सायकलवरून जाणारे तीन युवक जखमी झाले.
तिघांनाही बारामती येथे उपचारासाठी नेण्यात आले असता त्यापैकी ज्ञानेश्वर गहिनीनाथ ढोले (वय १७, राहणार वंजारवाडी खर्डा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर घटनेत
प्रथमेश सुनील भिसे (वय १७ राहणार वायसेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर व विक्रम विजय धायगुडे (वय १६ राहणार सरडे) हे जखमी झाले आहेत.तिन्ही युवक शारदानगर बारामती येथे आटीआय चे शिक्षण घेत आहेत. जखमी दोन्ही विद्यार्थी यांची प्रकृती आता धोक्याच्या बाहेर असून मृत्यू झालेल्या विद्यार्थी याचे शवविच्छेदन शासकीय रुग्णालय बारामती येथे करून त्याचे पार्थिव शरीर त्याच्या नातेवाईकांची ताब्यात देण्यात आला व घटनास्थळी सदर घटनेचा महसूल व पोलिस पंचनामा करण्यात येत होता.
0 Comments