Ticker

6/recent/ticker-posts

एमपीडीए कायद्यान्वये कुंदन कराडकर स्थानबद्ध



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
कराड: कराड शहरातील गजानन हौसिंग सोसायटीतील अट्टल गुंड  कुंदन जालींदर कराडकर याला एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती   कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
कराड शहर स्टेशन हहीत राहणारा सराईत गुन्हेगार कुंदन जालीदर कराडकर (वय 27 वर्षे रा. गजानन हौसिंग सोसायटी, सैदापूर ता. कराड जि.सातारा.) याचे विरुद्ध एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिव्हिटी) कायद्यान्वये स्थानबध्द करणे बाबतचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील  यांनी सादर केलेला होता. नमूद प्रस्तावाची अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी पडताळणी करुन प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आलेला होता.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्थानबद्ध इसमाने स्वतः तसचे साथीदारांच्या मदतीने मुत्यू किंवा जबर दुखापत घडवुन आणण्याच्या प्रयत्नांसहित जबरी चोरी किंवा दरोडा, मुत्यू किंवा जबर दुखापत यांची भिती घालून अपहरण करणे, जबरी चोरी करणे, लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासुन वाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे, दुखापत, हमला किंवा गैरनिरोध करण्याची पूर्व तयारी करुन गृहआगळीक करणे, दंगा मारामारी करणे, चोरी करणे, शिवीगाळ दमदाटी करणे, विनापरवाना शस्त्र बाळगणे हददपार आदेशाचे उल्लंघन करुन विनापरवाना हददापार केलेल्या क्षेत्रात प्रवेश करणे, सुर्यास्त व सुर्योदय यांचे दरम्यान संशायास्पद स्थितीत मिळून येणे असे गुन्हे केलेने तसेच स्थानबद्ध इसमाकडून सार्वजनिक शांततेस बाधा उत्पन्न होणारी कृत्ये होत असल्याने व तो धोकादायक व्यक्ती झालेची खात्री झाल्याने  कुंदन  कराडकर  याला 1  वर्षाकरीता सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करणेबाबतचा आदेश पारीत केले.
नोव्हेंबर 2022 पासुन 10 मोक्का प्रस्तावामध्ये 128 इसमांविरुध्द मोक्का कायद्याअंतर्गत, म.पो.का. कलम 55 प्रमाणे 25 उपद्रवी टोळयांमधील 81 इसमांना, म.पो.का. कलम 56 प्रमाणे 26 इसमांना, म.पो.का. कलम 57 प्रमाणे 03 इसमांना असे एकुण 110 इसमांविरुध्द तडीपार सारखी तसेच चझऊ- कायदयान्वये 02 इसमांवरुध्द स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे.
भविष्यातही सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द मोक्का, हददपार, एम.पी.डी.ए. अशा प्रकारच्या कठोर कारवाई करणेत येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
काय आहे एमपीडीए अ‍ॅक्ट?
 महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, हातभट्टीवाले तसेच धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 म्हणजेच एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिव्हिटी) होय.

Post a Comment

0 Comments