मयत भाऊसाहेब शेडगे
अपघातात चक्काचुर झालेली मोपेड
धडक देणारा टँकर
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
नागठाणे: पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरतगाव (ता.सातारा ) नजीक झालेल्या अपघातामध्ये भाऊसाहेब अण्णा शेडगे (वय 68 रा. भरतगांव) यांचा मृत्यू झाला तर ओंकार संतोष जाधव हा गंभीर जखमी झाला आहे.
प्रत्यक्ष घटना स्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की मयत भाऊसाहेब शेडगे हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. ते काही कामानिमित्त नागठाणे येथे गेले होते. तिथुन परत येताना त्यांनी ओंकार जाधव यास सोबत गाडीवर घेतले होते. शेडगे हे त्यांची अँक्टीवा(क्रर एम. एच ११ सी. टी८१६९) मोपेड स्वतः चालवित होते. तर ओंकार पाठीमागे बसला होता. महामार्गावरून येताना हॉटेल महाराजा जवळच्या अरूंद पुलावर पाठीमागुन भरधाव आलेल्या टँकरने (क्र. एम. एच. १३. डी. क्यु. ३१४९ )त्यांच्या मोपेडला जोराची धडक दिली . या अपघाता मध्ये भाऊसाहेब शेडगे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सिव्हील हॉस्पीटल मध्ये दाखल केले होते. परंतू तिथे त्यांचा मृत्यू झाला. तर ओंकार जाधव जखमी झाला. त्याच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मयत भाऊसाहेब शेडगे हे सरस्वती विद्यालय कोरेगाव येथुन निवृत्त झाले होते. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील अधिक्षक किर्ती शेडगे यांचे ते वडील होते. भरतगाव परिसरामध्ये त्यांच्यामृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे पत्नी,एक मुलगा,तीन विवाहित मुली असा परिवार आहे.रात्री उशीरा टँकर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम बोरगाव पोलीस ठाण्यात चालू होते.
0 Comments