मायणी मेडीकल कॉलेज संचालक मंडळावर गुन्हा - सत्य सह्याद्री

Monday, August 12, 2024

मायणी मेडीकल कॉलेज संचालक मंडळावर गुन्हा

 


वडूज/मायणी: प्रतिनिधी मेडिकल कॉलेजच्या कोविड घोटाळा प्रकरणात संपूर्ण संचालक मंडळावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सातारा जिल्हा समन्वयक देविदास बागल यांनी वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या संचालक मंडळात  
आमदार जयकुमार गोरे यांचा समावेश आहे.
यासंदर्भात मायणी येथिल दीपक देशमुख यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मृत रुग्णांच्या नावे महात्मा फुले जन आरोग्य योजनेमधून कोट्यावधी रुपये हडपल्याचा आरोप केला होता. त्यानुसार न्यायालयाने आ. गोरेंविरोधात कठोर भूमिका घेत वडूज पोलिसांना चांगलेच फटकारले होते. १२ ऑगस्ट रोजी या याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार असून त्या आधीच गुन्हा दाखल करण्यात आल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

No comments:

Post a Comment