माणचा आमदार तीन महिन्यांचा धनी : अनिल देसाई , नैसर्गिक न्यायाने मीच ‘तुतारी’चा उमेदवार: - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, August 4, 2024

माणचा आमदार तीन महिन्यांचा धनी : अनिल देसाई , नैसर्गिक न्यायाने मीच ‘तुतारी’चा उमेदवार:

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
देवापूर: कार्यकर्त्यांचे हित जोपसण्यासाठी विधानसभा निवडणूक लढणार आहे. या खेपेस नैसर्गिक न्यायाने उमेदवारीसाठी आपला हकक आहे. शरद पवार यांना भेटून उमेदवारीची मागणी करणार आहे.  अशी ठाम भूमिका जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी स्पष्ट केली. दरम्यान, माणचा आमदार तीन महिन्यांचा धनी असल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केली. दहिवडी येथील आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी मोतीराम जगताप, जालिंदर खरात, आण्णा मगर, बापू बनगर, महेंद्र देसाई,तुकाराम पवार उत्तम खाडे, देवराज कट्टे, पिंटू शेठ जगदाळे, तानाजी काटकर,पोपट देवकर सखाराम देवकर, हर्ष वर्धन अनिल देसाई,अमोल कोकाटे, तुषार झीमल, संदीप माने, श्रीपती मासाळ, रामभाऊ मासाळ सुभाष धोत्रे, डॉ नानासाहेब शिंदे,भारत अनुसे , नितीन चव्हाण, दत्ता चव्हाण, बाळासाहेब कदम स्वप्नील माने , आप्पा मासाळ,नंदकुमार मासाळ, नानासाहेब कोकरे, शंकरराव जाधव, तानाजी काळेल, दत्ता नलावडे, पोपट आवळे, राजू भोसले, किसन विरकर, वसंत दडस, दत्ताराम पाटील, सतीश आपा, जयवंत जगदाळे, रघुनाथ माने, वसंत द ड स, तानाजी जाधव, बाळासाहेब कदम, संदीप माने, श्रीपती मासाळ, चंदू काका पोळ, उदय जगदाळे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

देसाई म्हणाले, कार्यकर्त्यांनी फक्त तीन महिने काम करावे. मी शेतकर्‍याचा पोरगा आहे.पीक केवळ पाण्यावर  येत नाही तर त्याला खत माती लागते. मनी, मसल दोन्ही पॉवरचा वापर करून जशास तशा पध्दतीने उत्तर दिले जाणार आहे .  आम्ही लोकांची मने पेटवत नाही तर आम्ही चुली पेटवतो.याखेपेस नैसर्गिक न्यायाने उमेदवारीसाठी आपला हक्क आहे. त्यामुळे पवार साहेबांना भेटून तुतारी चिन्हांची मागणी करणार असून आगामी विधानसभा निवडणुक ही कोणत्याही परिस्थितीत जिंकणारच. लोकसभेत मी जी भूमिका घेतली याचा परिणाम असा झाला की तुमच्या विचारांचा खासदार मोहिते पाटील यांच्या रूपाने आपणाला मिळाला. मागील पंच वार्षिक ला सर्वांची मोट बांधली. सर्वांनी माझे नाव घेतलं. परंतु देशमुख यांनी मला संधी देण्याची विनंती केली. मी मोठ्या मनाने माघार घेतली. आणि पाठिंबा दिला. आता यावेळी मी त्यांना भेटून सांगणार आहे यंदा मला उमेदवारी द्या. तुतारी च्या माध्यमातून एक आमदार माझ्या रुपाने पवार साहेबांकडे असेल. तुमच्या आशीर्वादाने ही भूमिका मी घेतली आहे . कार्यकर्त्यांनो काय काळजी करू नका एकास एकच होणार आहे. यंदा काहीही झाले तरी लढायच च आहे आणि जिंकायचं ही आहे. स्वाभिमानाची ही लढाई जिंकणारच. असे ते म्हणाले.
युवक नेते महेंद्र देसाई म्हणाले की येणारी विधानसभा ही लढवणार म्हणजे लढविणारच असून विजयाची पताका रोवणारच. तुम्ही वराजकरणात ही न्हवता  तेव्हा सामान्यांना सोबत घेऊन टेंभूचे पाणी आणून दाखवले. एका शेणवडी च्याकोंबडी वाल्याला मला सांगायचं आहे  आपली दानत तपासावी. ज्याच्या मागे 15 लोक नाहीत त्यांनी स्वतःची उंची तपासावी. विमा कंपनीचे पैसे धापणार्‍यानी शहाणं पण शिकवू नये. अनिल भाऊ सय्यमी आहेत पण महेंद्र देसाई नाही त्यामुळे आमच्या कार्यकर्त्य च्या केसाला जरी धक्का लागला तर गाठ माझ्याशी आहे. ग्राम पंचायत मध्ये आपटलेल्या नी अनिल भाऊंची मापे काढू नयेत. 


No comments:

Post a Comment