प्रतिनिधी / भंडारा
बाबा हनुमानजी सेवक सहकारी पतसंस्था मर्या, भंडारा येथे मोठ्या अपहाराची
घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पतसंस्थेचे व्यवस्थापक सतिश विठ्ठल
सुर्यवंशी (वय 44, रा. खमारी, बुट्टी, ता. जि. भंडारा) यांनी भंडारा शहर
पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार,
आरोपी नागेंद्र शंकर डहाके (वय 45, रा. आंबेडकर वार्ड, निशा शाळेसमोर,
भंडारा) हा 2015 पासून पतसंस्थेत एजंट म्हणून कार्यरत होता. जानेवारी 2022
ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत आरोपीने 12 खातेधारकांकडून ठेवीच्या
स्वरूपात पैसे घेतले. मात्र, त्याने ते पैसे पतसंस्थेत जमा न करता
स्वतःकडेच ठेवून अपहार केला. यामुळे एकूण 8 लाख 7 हजार 100 रुपयांचा अपहार
झाल्याचे उघडकीस आले आहे.
संस्थेची
व खातेधारकांची फसवणूक केल्याचे निदर्शनास येताच, व्यवस्थापक सुर्यवंशी
यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून भंडारा शहर पोलीस ठाण्यात
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भंडारा पोलीस
स्टेशनला अप. क्र. 134/2025, भादंवि कलम 409 (विश्वासघात करून अपहार) आणि
420 (फसवणूक) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस
हवालदार कनपुरिया करीत आहेत.
या
प्रकारामुळे पतसंस्थेचे ग्राहक आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
खातेधारकांनी आपली खाती आणि व्यवहार तपासून पाहावेत, असे आवाहन संस्थेकडून
करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment