सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत सराईत गुन्हेगारासह दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून दोन देशी बनावटीची पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे व धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली. या कारवाईत खुनाचा कट उधळण्यात यश आले.
विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचनांनुसार पथकाने सापळा रचला. डबेवाडी परिसरात संशयित शस्त्रासह थांबले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने धाड टाकली. संशयित पळण्याचा प्रयत्न करत असताना पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले.
करण जोतिराम चव्हाण (वय २१, रा. डबेवाडी, ता. सातारा) व एक अल्पवयीन मुलगा यांना ताब्यात घेण्यात आले. तपासात दोन पिस्तूल, पाच काडतुसे, एक सुरा, दोन कुकरी, दोन भ्रमणध्वनी संच व एक दुचाकी असा एकूण ३ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वैरातून खून करण्याच्या उद्देशाने आरोपी शस्त्रासह फिरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पुढील तपास सुरु आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या पथकाने केली. सहभागी अधिकारी व अंमलदारांचे वरिष्ठांकडून अभिनंदन करण्यात आले.

0 Comments