पुणे महसूल विभागात झिरो पेंडसीचे काम आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या आदेशनुसार सुरु होते. त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी तालुका आणि सर्कलपर्यंत भेटी देवून या कामाचा पाठपुरावा केल्यामुळे सातारा जिल्ह्यातील झिरो पेंडसीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून जवळपास 45 टन कालबाह्य अभिलेखे नष्ट केल्यामुळे जिल्हा महसूल कार्यालय आता मोकळा श्वास घेत आहे.
जिल्हाधिकारी व अधिनस्त कार्यालयातील (महसूल विभाग) जनतेची कामे वेळेवर होत नव्हती तसेच कार्यालयात कामकाजाचे आस्ताव्यस्त कागदपत्रे दिसून येत होती. तसेच पाठपुरावा केल्याशिवाय प्रकरणांवर निर्णय होतच नाही अशी लोकांची धारणा झाली होती. विभागीय आयुक्त चंद्रकांत दवळी यांच्या सूचनेनुसार व जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली आस्ताव्यवस्त कागदपत्रांचे 6 बंडल सिस्टीम पद्धत अवलंबविण्यात आली. यामध्ये कागदपत्रांचे अ,ब,क,क-1 असे वर्गीकरण करण्यात आले. या वर्गीकरणामध्ये अ-कायमस्वरुपी, ब-30 वर्षे, क-10 वर्षे, क 1- 5 वर्षे आणि ड- 1 वर्ष अशी वर्गवारी करुन ड वर्गवारीची कागदपत्रे त्वरीत नष्ट करण्यात आली.
जिल्हायामध्ये सर्व तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी, विशेष भूसंपादन अधिकारी, शाखा प्रमुख जिल्हाधिकारी कार्यालयामधून जनतेच्या व प्रशासकीय कामकाजात होणारा विंलब टाळून सर्व थकीत प्रकरणांचा निपटारा करून विशिष्ट कालमर्यादेत प्रकरणे निर्गत करण्यासाठी झिरो पेंडन्सी ॲड डेली डिस्पोजल अशी कार्यपध्दती 1 मे, 2017 पासून अंमलात आणण्यात आली असून कार्यपध्दती दोन टप्यामध्ये राबविण्यात आली आहे.
पहिल्या टप्पयात अद्यावत केलेले एकूण 4 लाख 77 हजार 277 कागदपत्र पाठविण्यात आली. त्यामध्ये अ 2 लाख 47 हजार 170, ब-2 लाख 43 हजार 350, क- 33 हजार 491, क-1 1 लाख 8 हजार 922 असे एकूण 6 लाख 32 हजार 933 अभिलेखांचे वर्गीकरण करुन अभिलेख कक्षात अद्यावत करुन ठेवण्यात आले आहेत. अद्यावतीकरणानतंर एकूण 11 लाख 10 हजार 210 अभिलेखे जतन करुन ठेवण्यात आले आहेत. वर्गीवारी नुसार यामध्ये अ- 3 लाख 4 हजार 968, ब-4 लाख 60 हजार 790, क-85 हजार 672, क-1 2 लाख 58 हजार 780 इतक्या अभिलेखांचा समावेश आहे. तर वर्गीकरणानंतर अभिलेख कक्ष अद्यावत करताना एकूण 44 हजार 818.36 किलो अभिलेख नष्ट करण्यात आले.
झीरो पेंडन्सी ॲड डेली डिस्पेजल तथा तत्पर प्रशासन मोहिमेमध्ये शाखाधिकारी, विशेष भूमीसंपादन, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार असे यांच्याकडे 16 सप्टेंबर 2017 अखेर 9 लाख 8 हजार 262 प्रकरणे प्राप्त झाली त्यापैकी 8 लाख 77 हजार 504 प्रकरणे निर्गत करण्यात आली असून 30 हजार 758 प्रकरणे शिल्लक आहेत, अशीही माहिती जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांनी दिली आहे.
सातारा जिल्ह्यातील तहसील आणि सर्कल कार्यालयात शेकडो जुन्या फाइली वर्षोनुवर्षे तसेच पडून होत्या. त्यामुळे सर्कल, तहसील कार्यालयात अनेक कालबाह्य कागदांमुळे मोठे-मोठे ढिगारे पडून कार्यालयात टेबलावर बसणारा लिपीक त्या फायलीत लपून जायचा. सगळीकडे फायलींचे ढीग ही महसूल प्रशासनाची ओळख आमच्यासाठी भुषणावह नव्हती त्यामुळे मी प्रत्येक तहसील आणि काही सर्कलमध्येही जावून हे दृष्य पाहिले होते. आता जवळपास 45 टन कालबाह्य कागद काढल्यामुळे कार्यालये स्वच्छ आणि प्रसन्न दिसत असल्याचे सांगून आता रोजच्या रोज फाईली हालतील आणि विना विलंब जनतेची कामं होतील, अशा भावनाही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी बोलून दाखविली.
0 Comments