झोपडपट्टीतील नागरिकांना दिपावलीच्या साहित्याचे वाटप करताना डॉ. सूर्यकांत कुंभार
मायणी प्रतिनिधी
येथील श्रेयस हॉस्पिटलचे प्रथितयश डॉक्टर सूर्यकांत मारुती कुंभार यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कार्य करुन एक आगळावेगळा ठसा निर्माण केला आहे.
दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा अशी म्हण प्रचलित आहे आणि ती खरीच आहे. मात्र सर्वजणांनाच या दिवाळी सणाचा आनंद आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे घेता येतोच असे नाही. ही बाब लक्षात घेऊन डॉ.कुंभार यांनी या दिवाळीत प्रत्यक्ष कृतीतून उतरवली. डॉ. कुंभार यांच्या निवासा शेजारी सुमारे १०ते १२ झोपडया आहेत. या झोपड्यांमध्ये अठरा विश्व दारिद्रय असते. या मुलांना चांगले कपडे नसतातच त्याशिवाय चांगला आहार देखील मिळत नाही. दिवाळीत इतर मुले फटाके वाजविताना या मुलांना त्याकडे केवळ पहातच रहावे लागते. बाहेर सर्वत्र दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांचा केवळ वास घेण्याशिवाय अन्य पर्याय नसतो. वा दारोदारी भिक मागून खाण्याशिवाय काही करता येत नाही.
या सर्व बाबी त्यांनी जवळून पाहिल्या. या लोकांना दिवाळीचे कांहीतरी देऊन त्या कुटुंबांना दिवाळीचा थोडासा आनंद देण्याचा निश्चय त्यांनी केला. या झोपडीतील एकूण १५ कुटुंबांना दिवाळीचे फराळाचे पदार्थ, फटाके, लहान मुलांना कपडे व माहिलांना साडया देऊन या कुटुंबियांच्या आनंदात सहभागी होऊन एक सामाजिक बांधिलकी पत्करुन समाजापुढे दिन दलितांबद्दल समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
यापूर्वीही सगळीकडे स्वाईन फ्ल्यूच्या साथीने सर्वत्र हाहाकार पसरला होता त्यावेळी डॉ. सूर्यकांत कुंभार यांनी मायणी व मायणी परिसरातील अनेक गावांमध्ये स्वतः जाऊन जवळपास पाच हजारच्या वा लोकांना स्वाईन फ्लू प्रतिबंधक लस मोफत देऊन असाच सामाजिक उपक्रम राबविला होता. या त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील गौरवपूर्वक कामगिरी बद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.

0 Comments