मायणी
येथील नामांकित वकील अॅड. योगेश जगदीश चन्ने यांची सहाय्यक सरकारी अभियोक्ता या पदासाठी महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केली आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट अ या पदासाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत महाराष्ट्र शासनाने एकूण १७५ उमेदवारांची नेमणूक केली होती त्यामध्ये अॅड.योगेश चन्ने यांनी १४वा क्रमांक पटकाविला. त्यांनी एल. एल.बी ही पदवी सातारा येथील लॉ कॉलेज मधून प्राप्त केली. सन २००५पासून त्यांनी वकिली व्यवसायास प्रारंभ केला. त सातारा वडूज येथील कोर्टात क्रिमीनल विभागात काम करीत होते. महाराष्ट्र शासनाने घोडेगाव ता.आंबेगाव. जि. पुणे येथे त्यांची नेमणूक केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

0 Comments