जेजुरी
दि. ३
( वार्ताहर
) जावया
बरोबर आलेल्या त्याच्या चुलत
भावाने नातेवाईक असल्याचा
फायदा घेवून घराच्या कपाटातील
सुमारे ५३ हजार रुपयांचे
दागिने चोरून पळून गेलेल्या
आरोपीस सासवड न्यायालयाने
एक वर्षे एक महिना कारावास
तसेच दोन हजार रुपये दंडाची
शिक्षा ठोठावली असल्याची
माहिती जेजुरी पोलीस स्टेशनचे
सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास
वाकोडे यांनी दिली.
शिक्षा
झालेल्या आरोपीचे नाव अमर
मारुती कदम रा. मुंबई
असे आहे.
या
बाबत जेजुरी पोलिसांनी दिलेली
माहिती अशीकी फिर्यादी हिराबाई
निवृत्ती जगताप रा.
कोथळे ता.
पुरंदर जि.पुणे
. यांच्या
घरी दि.२४/८/२०१६
रोजी त्यांचे जावई,
मुलगी व जावयांचा
चुलत भाऊ अमर मारुती कदम रा.
मुंबई हे
राहण्यास आले. होते.
फिर्यादी
यांची मुलगी हिने दौंडज येथे
आजारी असणाऱ्या नातेवाईकांना
भेटायाला जायचे असून तेथे
चोऱ्या होतात म्हणून दागिने
कपाटात काढून ठेवले.
दि.२५
रोजी पहाटे सहा वाजता अमर कदम
हा कोणालाही काही न सांगता
निघून गेला.दि
.२६
रोजी कपाटातील सुमारे ५३ हजार
रुपये किमतीचे दागिने चोरी
झाल्याचे लक्षात आले.
फिर्यादी यानी
यांनी याबाबत जेजुरी पोलीस
स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली
जेजुरी पोलिसांनी दि.४/९/२०१६
रोजी आरोपी अमर कदम याला अटक
केली त्यावर भा.द.वी.कलम
३८० अन्वये गुन्हा दाखल केला
या प्रकरणाचा तपास जेजुरी
पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस
निरीक्षक रामदास वाकोडे,पोलीस
हवालदार एम.के.कदम
यांनी केला .
सदर
आरोपीस सासवड न्यायालायचे
न्यायाधीश अमित दिंडे यानी
एक वर्षे एक महिना कारावास
तसेच दोन हजार रुपये दंडाची
शिक्षा ठोठावली आहे.
0 Comments