Hot Posts

6/recent/ticker-posts

अभियंत्याला दिला कोळसा भेट


कराड (सागर शेवाळे) 
सध्या राज्यात दिवाळीचं आनंदी वातावरण असताना नेमकी ऐन दिवाळीत वीज कपात करुन आधीच वैतागलेल्या सामान्य नागरिकांना वीज वितरण कंपनीनं सामान्य जनांच्या आनंदात विरजण घालण्याचा प्रकार केला आहे त्यामुळे आज विज वितरण कंपनीच्या कराड कार्यालयात जाऊन कार्यालयाचे सहाय्यक वरिष्ठ अभियंता एस.पी.जाधव ह्यांना कोळसा भेट देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.सचिन नलवडे (आबा), कराड शहर शिवसेनेचे शशिराज करपे तसेच संभाजी ब्रिगेडचे कराड तालुकाध्यक्ष शिवश्री शैलेश मोरे व शिवश्री भुषण पाटील यांनी निषेध व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments