Ticker

6/recent/ticker-posts

कारने ठोकरल्याने पादचारी ठार


सातारा, ग्वाल्हेर-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गोडोलीनजीक असणार्‍या अजंठा चौकातील उड्डाणपुलावर रविवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान चारचाकी गाडीने रस्ता ओलांडणार्‍या पादचार्‍याला उडवल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रामचंद्र मारूती खिलारे (वय 59 रा. वाठार किरोली, ता. कोरेगाव), असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
खिलारे कराडवरून खाजगी वाहनाने वाठार किरोली येथे जाण्यासाठी अजंठा चौकातील उड्डाण पुलावर  उतरले, तेथून महामार्ग ओलांडताना कारने (क्रमांक एम. एच. 12 केव्ही 2210) खिलारे यांना उडवले. या अपघातात खिलारे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कोल्हापूर-पुणे बाजूकडील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments