Ticker

6/recent/ticker-posts

वडूजनजीक भीषण अपघातात औंधच्या दोन मित्रांचा दुर्दैवी अंत


 सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क 
औंध/गोंदवले/वडूज
वडूज दहिवडी रस्त्यावर स्वामी समर्थ मंदिरात नजीक झालेल्या तिहेरी भीषण अपघातात औंध येथील दोन जण ठार सदर अपघाताची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाले असून पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे
सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दहिवडी वडूज रस्त्यावरती असणाऱ्या स्वामी समर्थ मंदिरा नजीक स्विफ्ट गाडी एच एच 03 डी ए 7354 ही गाडी प्रसाद उर्फ बाबू राजेंद्र सुतार हा चालवत होता यावेळी त्याच्यासोबत शिवम हनुमंत शिंदे हा देखील गाडीत होता प्रसाद सुतार यांने निष्काळजीपणाने भरधावपणे गाडी चालवून त्याच्या समोर असणाऱ्या ओमनी क्रमांक एच एच 14 डी एन 2758 हिस पाठीमागुन जोराची धडक दिली त्या नंतर दहिवडी कडून वडूज जाणाऱ्या पीकप गाडी क्रमांक एच एच 11 सी एच 3342 ला समोरुन जोराची धडक देऊन मोठा भीषण अपघात केला या अपघातात शिवम शिंदे आणि प्रसाद सुतार यांचा मृत्यू झाला तर स्विफ्ट मध्ये असणारे
मनोज शंकर रनदिवे, सत्यम राजेंद्र खौरमोडे दोन्ही रा. औंध, तसेच पिकप गाडीमधील लालासो परशुराम पाटोळे,ज्योती लालासो पाटोळे दोन्ही रा.दरुज. ओमनी गाडी मधील रोहन आप्पासाहेब भीसे व आकाश सोनबा बर्गे रा. वडुज हे गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी स्टाफसह अपघात स्थळी भेट देऊन जखमींना अधिक उपचाराला सातारला पाठवले वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले
सदर अपघाताची नोंद एवढच पोलीस ठाण्यात झाले असून फिर्याद धनाजी आबाजी सुळे राहणार पिंपळवाडी तालुका खटाव यांनी दिलेली आहे
     या अपघातात मयत पावलेला शिवम शिंदे हा औंध शिक्षण मंडळाचे विश्वस्त श्री हणमंतराव शिंदे यांचा मुलगा आहे तर प्रसाद सुतार हा औंध शिक्षण मंडळाचे कर्मचारी राजेंद्र सुतार यांचा मुलगा असून दोघेही दोन मित्र होते त्यांच्या अपघाती निधनाने औंध गावावर शोककळा पसरली असून आजचा बाजार रद्द केला आहे.

Post a Comment

0 Comments