औंध(वार्ताहर):-औंधच्या सरपंचपदी सौ.नंदिनी सुखदेव इंगळे यांची बिनविरोध निवड झाली.
मागील दोन महिन्यापूर्वी सौ.रोहिणी थोरात यांनी राजीनामा दिल्याने सरपंचपद रिक्त झाले होते.शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंचपदाची निवडणूक झाली. यावेळी सौ.नंदिनी इंगळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची यापदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. या
अगोदर काही दिवसांपूर्वी उपसरपंचपदी सचिन शिंदे यांची ही बिनविरोध निवड करण्यात आली.
यानिवडीनंतर माजी उपमुख्यमंत्री आ.अजित पवार व माजी जि.प.अध्यक्षा श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यानिवडीनंतर बोलताना सौ.नंदिनी इंगळे म्हणाल्या श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी व औंध ग्रामस्थ ,सदस्यांनी आपल्यावर जो विश्वास दाखविला आहे .तो आपण सार्थ ठरविणार आहोत. सर्वांना बरोबर घेऊन औध गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.
यावेळी हणमंतराव शिंदे,राजेंद्र माने,आब्बास आतार,उपसरपंच सचिन शिंदे, रमेशबापू जगदाळे, रोहिणी थोरात, बापूसाहेब कुंभार,सुखदेव इंगळे, नारायण इंगळे,विष्णू इंगळे, शोभा इंगळे,लक्ष्मण इंगळे, सुवर्णा इंगळे, अलका इंगळे ,गणेश इंगळे,पै.कुलदीप इंगळे ,शरद इंगळे ,अमोल, ओंकारइंगळे विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

0 Comments