पाटण (संजय कांबळे यांजकडून )
पाटण तालुक्यात आज (बुधवारी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शासनाच्या विरोधात विविध मागण्यांसाठी युवानेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला.
आज पाटण येथील बचत भवन (नविन पंचायत समिती) पासून दुपारी १ वाजता मोर्चाची सुरवात होऊन पाटण तहसीलदार कार्यालयावर हा मोर्चा धडकला. त्या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी उपस्थित जनतेला सत्यजित पाटणकर यांनी संबोधित करताना मोदी सरकार व शासनाकडून सर्व सामान्य जनतेची,शेतकऱ्यांची होत असलेल्या पिळवणूकी बद्दल जोरदार टीका केली,शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी,शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा,जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करावे,भारनियमन रद्द करावे,पाटण तालुक्यातील रखडलेल्या धरणग्रस्त/प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा,ऊसाला चांगला दर मिळावा इत्यादी मागण्यां यावेळी केल्या. या मागण्याचे निवेदन तहसीलदार पाटण यांना देण्यात आले. प्रारंभी पंचायत समितीचे उपसभापती मा. राजाभाऊ शेलार,तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, युवकचे अध्यक्ष शंकरराव शेडगे,महिला आघाडीच्या स्नेहल जाधव,आदींची भाषणे झाली. यावेळी पंचायत समितीच्या सभापती उज्ज्वला जाधव, संजय देसाई,रमेश मोरे,राजेश पवार माजी सभापती सौ. संगिता गुरव तसेच जिल्हा परिषदेचे व पंचायत समितीचे आजी माजी सदस्य उपस्थित होते.
मोर्चात शेतकरी, महिला, युवक मोठ्या संख्येने हजर होते.


0 Comments