फलटण/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा
पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये दिनांक २२ पासून कीटकनाशकाच्या उपचारासाठी दाखल करण्यात आलेले वाठार निंबाळकर येथील संतोष वामन कदम व पूजा संतोष कदम या पती-पत्नीना आज दिनांक २६ रोजी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला.
कीटकनाशकाचा शरीरावर परिणाम होऊन व्हायरल इन्फेक्शन झाला असल्याची शक्यता गृहीत धरून ससून हॉस्पिटलमध्ये दिनांक २२ पासून उपचार सुरू होते. कीटकनाशकाच्या विषबाधा नुसार ससून हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार झाल्यामुळे संतोष वामन कदम व पूजा संतोष कदम यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा असून जीवितास कोणताही धोका नसल्याचे नातेवाईक यांच्याकडून सांगण्यात आले.
दैनिक सत्य सह्याद्रीने सदर घटनेबाबत शासकीय यंत्रणेला अवगत करून सदर घटनेबाबत संबंधित शासकीय विभागांना दिनांक २३ रोजी वाठार निंबाळकर येथील घराची पहाणी करण्याबाबत अवगत केले असता त्यानुसार पाहणी व तपासणी केली असता कीटकनाशकाचा वापरामुळे ही दुर्घटना झाली असल्याबाबतचा दैनिक सत्य सह्याद्रीचा संशय खरा ठरला होता.
आता या प्रकरणात शासकीय यंत्रणेकडून करण्यात येणाऱ्या तपासात कोणत्या गोष्टी पुढे येतील व यातून बोध घेऊन संबंधित शासकीय विभाग कोणत्या उपाययोजना राबविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 Comments