विडणी/ आशिष देशपांडे यांजकडून
फलटण तालुक्यातील विडणी येथील उपसरपंचपदी प्रशांत जाधव यांची निवड करण्यात आली. सरपंचपदी रुपाली अभंग या निवडून आल्या असून प्रशांत जाधव यांचा उपसरपंचपदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीनंतर सरपंच अभंग व उपसरपंच जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. जाधव व अभंग यांनी गावाच्या विकासासाठी एकमताने काम करणार असल्याचे यावेळी सांगितले. नवनियुक्त सरपंच व उपसरपंचांचे मान्यवरांनी अभिनंदन केले.

0 Comments