Hot Posts

6/recent/ticker-posts

पाटण नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराने जनतेत असंतोष-फत्तेसिंह पाटणकर


पाटण/प्रतिनिधी
पाटण नगरपंचायतीची पहिली निवडणूक होऊन एक वर्ष होत आहे. दरम्यान पाटण शहराच्या विकासासाठी शासनाने सुमारे ४ कोटी रुपयांचा निधी नगरपंचायतीस उपलब्ध करून दिला आहे. पण आजअखेर पाटण शहरातील कोणत्याही प्रभागात  एक रुपयाचे ही विकासकाम झालेले नाही. येथील जनतेने मोठ्या अपेक्षेने नगरसेवक निवडणूक दिले.पण नगरपंचायतीत होत असलेला गैरकारभार, घोटाळे व काही नगरसेवकांनी ताब्यात घेतलेल्या कारभारामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. जाहीर निवेदनामध्ये झालेला गैरकारभार, स्वच्छता गृहकामात झालेला घोटाळा तसेच शहरामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत वर्तमानपत्रातून झालेली बदनामी यामुळे नगरपंचायतीच्या कारभाराबाबत  येथील नागरिकांच्या मनात मोठी निराशा उत्पन्न झाली आहे.

विरोधी नगरसेवकांच्या प्रभागात मुलभूत कामे न करणे, व्यवस्थित पाणीपुरवठा न होणे, तसेच ५० माहिती अधिकार अर्ज व २५ राज्य माहिती आयोगाकडे केलेल्या आपीला मुळे पाटण नगरपंचायत चर्चेत आहे.या सर्व प्रकाराला मुख्याधिकारी व नगरपंचायतीने नेमलेले ठेकेदार व काही विशिष्ठ हेतूने झालेले नगरसेवक जबाबदार आहेत.

यामुळे वरिल सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी व स्थानिक जनतेला मुलभूत सुविधा त्वरित मिळण्यासाठी पाटण तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने लवकरच आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामध्ये पाटण नगरपंचायतीस नवीन मुख्याधिकारी देण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचेकडे करणार असल्याचे प्रतिपादन  भाजपाचे पाटण तालुका सरचिटणीस फत्तेसिंह तथा भैय्या पाटणकर यांनी निवेदनाद्वारे जाहीर केले  आहे.

Post a Comment

0 Comments