पुस्तकाचे गाव (भिलार) / सत्य सह्याद्री वृत्तसेवा
जिल्हा ग्रंथालय संघाचा महात्मा फुले आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार २०१७ सातारा येथील आदर्श नगरसेवक रवी झुटिंग याना रविवारी प्रदान करण्यात आला
पुस्तकाचे गाव (भिलार) येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या पुरस्काराबद्दल झुटिंग यांचे अनेकांनी अभिनंदन केले.
या पुरस्काराबाबत प्रतिक्रिया देताना झुटिंग म्हणाले,
मला, "आदर्श नगरसेवक पुरस्कार २००३, सातारा. युवा भूषण पुरस्कार२००४, पुणे. वृक्षमित्र पुरस्कार २००८, मुंबई. रोटरी व्यवसाय सेवा पुरस्कार २०१५, सातारा. आणि ऍक्टिव्ह मेंबर आय.एन.ओ. २०१७, दिल्ली." हे मानाचे पुरस्कार मिळालेले. या पुरस्कारांनी अधिक चांगल्या पध्द्तीने सामाजिक काम करण्याची ऊर्जा मिळाली.
या सर्व पुरस्कारांनी जबाबदारी वाढल्याची जाणीव तर आहेच. पण हे पुरस्कार मला मिळाले असले तरी याचे सर्व श्रेय माझा बरोबर काम करणाऱ्या सर्व मित्राचे, सहकार्याचे आणि संघटनेचे आहे.


0 Comments