Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवसैनिकावरील खोटे गुन्हे रद्द करा - चंद्रकांत जाधव. वडूज पोलिसांना शिवसेनेचे निवेदन


वडूज/ सत्य सह्याद्री वृत्तसेवा 
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख विश्वास चव्हाण व महिला पदाधिकारी यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा खोटा असून ती रद्द करण्यात यावा व संबंधित डॉक्टर व पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी आज जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी वडूज पोलिसांना निवेदन दिले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, उपजिल्हाप्रमुख संजय भोसले, रामभाऊ रैनाक, तालुका प्रमुख युवराज पाटील,  बाळासाहेब जाधव, सचिन भिसे यांच्या सह जिल्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनातील माहिती नुसार शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण कक्षाच्या जिल्हाप्रमुख व महिला पदाधिकारी यांच्यासह इतर शिवसैनिकांवर राजकीय हेतू साधून तसेच पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्यावर खंडणी सारखे भयंकर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख चव्हाण यांनी वडूज पोलीस ठाण्यात दि. ११ डिसेंबर रोजी  डॉ. माने यांच्या चारुशीला हॉस्पिटलमध्ये दि. ०६ /०४/ २०१४ रोजी रंजना देशमुख यांचे ऑपरेशन झाले असल्याची माहिती तसेच डॉक्टर यांनी निष्काळजी पणे व पेशन्टची दिशाभूल केली असल्याची तक्रार केली होती.
दरम्यान हि तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून सदरचा गुन्हा राजकीय प्रेरित होऊन शिवसेना पक्ष बदनाम करण्याचा कटकारस्थान केले आहे. तसेच चव्हाण यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉक्टरांवर कारवाई करण्याऐवजी डॉक्टरशी हातमिळवणी करून खोटे गुन्हे दाखल केले आहेत.
दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याचा तपास होऊन ताबडतोब संबंधितावरील खोटे गुन्हे रद्द करण्यात यावेत आणि पोलीस आधिकऱ्यावरती पदाचा चुकीचा अधिकार दाखवून कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता गुन्हा नोंद करणाऱ्या अधिकाऱ्यावर पक्षाची व व्यक्तीचा बदनामी करणेचा गुन्हा नोंद करून घेतला आहे. त्यामुळे आम्हा शिवसैनिकांना न्याय द्यावा व संबंधीत डॉक्टरवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक अन्यायाविरोधात  रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाइलने न्याय मिळवून घेवू असा इशारा हि यावेळी देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments