वरकुटे-म्हसवड / सत्य सह्याद्री वृत्तसेवा
सातारा जिल्हा ग्रामसेवक संघटना डी एन ई १३६ च्या अध्यक्षपदी दिपकराव दवंडे तर सरचिटणीसपदी नंदकुमार फडतरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जिल्हासंघटनेच्या अध्यक्ष व सरचिटणीस यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या दोन्ही पदांच्या निवडणूक प्रक्रियेसाठी सातारा येथील ग्रामसेवक भवनात महाराष्ट्रराज्य ग्रामसेवक संघटनेचे सरचिटणीस प्रशांतजी जामोदे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी संघटनेच्या पुढील कार्यकाळासाठी अध्यक्ष म्हणून पाटणच्या तालुका संघटनेचे सलग २२ वर्षे अध्यक्ष असलेल्या दिपकराव दवंडे यांची तर सरचिटणीसपदी नंदकुमार फडतरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सरचिटणीस पदी निवड झालेले नंदकुमार फडतरे हे उत्तम संघटक आहेत त्यांनी माण तालुका ग्रामसेवक संघटनेचे सचिव पद,राज्य कैंन्सिलर पद भुषवले आहे.२००७ पासून ते माण तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
नुतन अध्यक्ष व सरचिटणीस यांचे मावळते अध्यक्ष उद्धवराव फडतरे, उपाध्यक्ष विजयराव निंबाळकर यांचेसह जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी व सर्व ग्रामसेवकांनी अभिनंदन केले आहे.

0 Comments