सातारा@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
उंब्रज येथे 22 नोव्हेंबर 2017 रोजी वृद्धेचा खून करून टाकण्यात आलेल्या दरोड्यातील टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सातारा पोलीस दलाचा मोक्काचा धडाका सुरुच असून आतापर्यंत 9 टोळ्यांवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट व कर्मचार्यांनी अवघ्या दोन दिवसांतच नगर पोलिसांची मदत घेवून या टोळीला अटक केली. यामध्ये त्यांच्याकडून सोन्याचा हार, सोन्याची बांगडी, चेनसह गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या टोळीचा प्रमुख रुकल्या दशरथ चव्हाण, शशिकांत ऊर्फ काळ्या दतू ऊर्फ दप्तर्या भोसले (वय 38, रा. मांडवगण, ता. श्रीगोंदा, जि.अहमदनगर), अतुल दतू ऊर्फ दप्तर्या भोसले (वय 23, वळगूड, ता. श्रीगोंदा, जि.अहमदनगर), अरुण दशरथ चव्हाण (वय 34, रा. पदमपूरवाडी, अहमदनगर) व देवराम गुलाब गोगरे (वय 36, रा. मांडवगण, म्हांडूळवाडी, गोसावीवस्ती, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) या पाच जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अन्वये प्रस्ताव तयार करुन कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील यांना पाठवला होता. यामध्ये ही टोळी खूनासह दरोडा, घरफोडी यांसारखे गंभीर गुन्हे वारंवार घडत असल्याचे समोर आले आहे. असे नमूद केले होते. त्यानंतर या प्रस्तावाला मंजुरी देवून या पाच जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली.
No comments:
Post a Comment