सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा : घरातील किरकोळ वादातून भूविकास बँक लगत, सदरबझार , सातारा येथे राहणारी युगंधरा रत्नदीप पवार (वय-२६) ही विवाहिता मंगळवार ता. १७ जुलै पासून पाच महिन्यांच्या चिमुरड्यासह बेपत्ता आहे. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल असून घरच्यांसह पोलिसांचा शोध सुरू आहे.पवार कुटुंबीय आणि पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, लहान जावेसोबत किरकोळ वाद झाल्याने युगंधरा पवार पाच महिन्यांच्या लहान बाळासह घरातून मंगळवार ता. १७ जुलै रोजी पहाटे कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडल्या. घरच्यांनी शोध घेतला असता नातेवाईक आणि पै-पाहुण्यांकडे मिळून न आल्याने अखेर पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली असून मिरज रेल्वे स्थानकावर त्या मंगळवारी दुपारपर्यंत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. मात्र, तदनंतर बेपत्ता युगंधरा यांचा शोध लागलेला नाही. सोबत पाच महिन्यांचे बाळ असून त्याच्या अंगावर चॉकलेटी कलरचा स्वेटर आणि २६ वर्षीय युगंधरा यांच्या अंगावर निळ्या रंगाची साडी आहे. संबंधित विवाहिता कोणाला आढळून आल्यास ०२१६२-२३०५८०, ९६०७४७४७४४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

0 Comments