सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
पंढरपूर :
सकळ ही तिर्थे घडती एक वेळा ।
पंढरी वैकुंठ देखलिया ॥
जगभरात अनेक तिर्थे आहेत. ही तिर्थे पाहणे आपणाला शक्य होत नाही. परंतू या सर्व तिर्थांमध्ये पंढरीचा महिमा अलौकीक आहे. पंढरपूर हे भूवैकुंठ आहे. ते पाहिल्यानंतर ही सर्व तिर्थे पाहिल्याचं साधान होते अशी भावना उरी बाळगून आषाढी वारीने सावळ्या विठुरायाच्या भेटीस निघालेल्या संत ज्ञानदेव, संत तुकाराम महाराज आदि संतांच्या पालख्यांसह सुमारे १० लाख वैष्णवांची मांदियाळी आज (रविवार) पंढरी नगरीत दाखल झाली. पंढरपूर नगरवासियांच्या वतीने संतांसह वैष्णवांचे मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राच्या दर्याखोर्यातून वाहत येणारा हा विठ्ठल भक्तीचा प्रवाह आज चंद्रभागेत विलीन झाला.
इंद्रायणी तिराहून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानराज, जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, गोदावरी तिराहून श्री निवृत्तीनाथ महाराज, श्री संत एकनाथ महाराज, कर्हा तिराहून श्री संत सोपानदेव महाराज, तापी तिराहून आदिशक्ती संत मुक्ताबाई यांच्यासह महाराष्ट्राच्या दर्याखोर्यातून अनेक संतांच्या पालख्या लाखो वैष्णवांसह काल (शनिवार) वाखरीत दाखल झाल्या होत्या. हा अतिभव्य दिव्य दुर्मिळ असा पालखी सोहळ्याचा शेवटचा मुक्काम वाखरी येथे होता. जिकडे तिकडे पताकांचे भार, टाळ, मृदुंगाचा निनाद, हरीनााचा जयघोष व वारकर्यांची दाटी दिसून येत होती. वारकरी सांप्रदायाचे खरे वैभव येथे दिसून आले. या सर्व संतांच्या दर्शनाचा लाभ लाखो भाविकांना येथे मिळाला.
दुपारचे भोजन व विश्रांतीनंतर वारकरी सांप्रदायाचा हा भक्तीप्रवाह आज (रविवार) पंढरीच्या दिशेने वाहू लागला. प्रत्येकाला विठूरायाच्या दर्शनाची ओढ लागली होती. दुपारी श्री संत नादेव महाराज हे पांडूरंगाचे निमंत्रण घेवून वाखरीत दाखल झाले. त्यानंतर या मानाच्या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. अग्रभागी संत नामदेवांचा पालखी सोहळा चालत होता. त्याागे संत मुक्ताबाई, संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ, संत तुकाराम तर सर्वात मागे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला.
वाखरी ते पंढरपूर हा भक्तीमार्ग टाळ, मृदुंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात दुमदुमून गेला होता. भागवत धर्माची पताका फडकावीत लाखो वैष्णव पंढरीच्या दिशेने वाटचाल करीत होते. प्रत्येकाला चंद्रभागेचे स्नान आणि विठूरायाच्या दर्शनाची आस लागली होती. सकाळी उन्हाचा तडाखा जाणवत होता. नंतर मात्र ढगाळ वातावरण झाले. पंढरपूर हाकेच्या अंतरावर राहिल्याने वारकर्यांमध्ये उत्साह संचारला होता.
इसबावी येथे पंढरपूर नगरपालिका, पादुका मंदिर देवस्थान समिती, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आदिंच्यावतीने आषाढी वारीने आलेल्या राज्यातील असंख्य पालखी सोहळ्यांचे व वारकर्यांचे मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले.
श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सायंकाळी इसबावी येथे पोहोचला. यावेळी चोपदारांनी उभे रिंगण लावून घेतले. वारकर्यांनी मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात रिंगण सोहळ्याचा आनंद घेतला. अश्वांनी तुकोबारायांना एक प्रदक्षणा पूर्ण करून पुन्हा रथाच्या अग्रभागी जावून पोहोचले. तुकाराम तुकाराम नामाच्या गजरात रिंगण सोहळा पूर्ण झाला. आरतीनंतर हा सोहळा पंढरीकडे मार्गस्थ झाला.
श्री ज्ञानराजांचा पालखी सोहळा वाखरी मुक्कामानंतर ओढा पार करून पुरंदरे मळ्याजवळ पोहोचला. येथे माऊलींची पालखी मुख्य रथातून उतरवून ती भाटेंच्या रथात ठेवण्यात आली. त्यानंतर वडार समाजाने हा रथ ओढत इसबावी येथील पादुका मंदिरापर्यंत आणला. यावेळी हजारो भाविकांनी खारीक, बुक्याची मुक्तपणे उधळण करीत माऊलींचे दर्शन घेतले. पंढरी समीप आल्याने दिंड्या दिंड्याध्ये टाळ, मृदुंगाच्या साथीने भजनात रंग भरला जात होता तर काही दिंड्यात विविध खेळ खेळले जात होते. सायंकाळी चोपदारांनी उभ्या रिंगणासाठी दिंड्या लावून घेतल्या. पालखी सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण येथे मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात पार पडले. हे रिंगण पाहण्यासाठी लाखो भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फ़ा गर्दी केली होती. आरतीनंतर श्री ज्ञानराजांच्या पादुका पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांनी श्रींमंत ऊर्जीतसिंह शितोळे सरकार यांच्या हातात दिल्या. त्यांनी त्या नवीन वस्त्राध्ये बांधून गळ्यात घेतल्या. त्यांच्या एका बाजूला वासकर तर एका बाजूला सोहळ्याचे मालक आरफळकर हे होते. लाखो वैष्णवांना घेवून शितोळे सरकार श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीकडे मार्गस्थ झाले. शितोळे सरकार यांच्या गळ्यात पादुका दिल्यानंतर त्यांचे रूप अत्यंत मोहक व सुंदर दिसत होते.
राजस सुकुमार मदनाचा पुतळा ।सकळ ही तिर्थे घडती एक वेळा ।

रविशशीकळा लोपलिया ॥
असेच त्यांचे सुंदर रूप चंद्र, सूर्यापेक्षाही तेजस्वी दिसत होते. वारंवार डोळे भरून त्यांचे रूप पहावे असेच वाटत होते.
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानराज, जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, श्री निवृत्तीनाथ महाराज, श्री संत सोपानदेव महाराज, संत मुक्ताबाई, श्री संत एकनाथ महाराज यांच्यासह असंख्य संतांच्या पालख्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, एस.टी.बसस्थानक, अर्बन बँक, नाथ चौकामार्गे रात्री पंढरीत मुक्कामी पोहोचल्या. या सर्व पालखी सोहळ्यांसोबत महाराष्ट्राच्या दर्याखोर्यातून आलेला विठ्ठल भक्तीचा प्रवाह भक्तीसागर असलेल्या चंद्रभागेत विलीन झाला व गेली महिनाभर सुरू असलेल्या या आनंद सोहळ्याची मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात सांगता झाली.

0 Comments