Hot Posts

6/recent/ticker-posts

मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळविले





सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
उंब्रज :     पेरले ता. कराड येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले असल्याची घटना रविवार दि. २२ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटनेची फिर्याद कृष्णाबाई काका आवळे रा. पेरले ता कराड यांनी उंब्रज पोलीसांत दिली आहे. 
दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादीची भाची ही गेले सात वर्षांपासून पेरले या ठिकाणी राहण्यास असून ती ११ वी च्या वर्गात शिकत आहे. शनिवार दि. २१ रोजी रात्री जेवण करुन आम्ही सर्वजण झोपी गेलो. त्यानंतर फिर्यादी आवळे रात्री उशिरा पाणी पिण्यासाठी उठले असता भाची घरात नसल्याचे त्यांना दिसून आली यावरून त्यांनी तिची शोधाशोध केली असता मिळून आली नाही. यावरून तिला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले असल्याची फिर्यादी आवळे यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात दिली असून अज्ञात इसमावर उंब्रज पोलीसांत गुन्हा दाखल झाला असून स. फौ. अभय तावरे करीत आहेत. 

Post a Comment

0 Comments